1 / 8कधी कोणत्या दागिन्यांची फॅशन येईल काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना सध्या लग्नसराईनिमित्त हाथी झुमका किंवा हत्ती झुमका कानातले खूप जास्त ट्रेण्डमध्ये आहेत.2 / 8कानातल्यांचा हा एक अगदी नवा प्रकार सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.3 / 8पुर्वी मोराचे कानातले, मोराचे झुमके हे प्रकार ट्रेण्डिंग होते. आता मात्र अशा पद्धतीचे हत्ती झुमके तरुणींचे लक्ष वेधून घेत आहेत.4 / 8हाथी झुमका या प्रकारात तुम्हाला ऑक्सिडाईज प्रकारातलेही कित्येक नवनवे डिझाईन्स मिळतील.5 / 8हत्ती झुमका प्रकारातलं हे एक आकर्षक डिझाईन पाहा. थोडे मोठे कानातले आवडत असतील तर हे डिझाईन तुम्ही घेऊ शकता.6 / 8झुमका प्रकारातले कानातले आवडत नसतील तर हे साधे टॉप्सही मिळतील. ते सुद्धा दररोज ऑफिसला, कॉलेजमध्ये घालायला छान दिसतात.7 / 8लोंबत्या कानातल्यांचाच हा एक सुंदर आणि नाजूक प्रकार पाहा. ज्यांना खूप मोठमोठे कानातले आवडत नाहीत, त्यांना अशा प्रकारचे हत्ती झुमके आवडू शकतात.8 / 8हत्ती झुमके प्रकारातला हा आणखी एक वेगळा पॅटर्न. अशा प्रकारचे झुमके तुम्ही तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारातूनही घेऊ शकता किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवरही ते उपलब्ध आहेत. १०० ते ३०० रुपये एवढी या कानातल्यांची किंमत आहे.