1 / 7लग्नाच्या आधीचा हळदीचा कार्यक्रम म्हटला की हल्ली पिवळ्या रंगाचे कपडे घातले जातात. 2 / 7तुम्हालाही तसाच हळद स्पेशल लूक करायचा असेल तर पुढे सांगितलेल्या काही आयडिया पाहा...3 / 7पिवळी साडी, कपाळावर चंद्रकोर, केसांचा अंबाडा आणि हातात हिरव्या बांगड्या... हा लूक म्हणजे मराठी लग्नसमारंभात अगदी चपखल शोभून दिसणारा आहे.4 / 7काठपदर साडी आणि मोत्याचे दागिने असा मस्त लूकही तुम्ही हळदीच्या निमित्ताने करू शकता.5 / 7थोडी नव्या पद्धतीची डिझायनर साडी आवडत असेल तर अशी प्लेन साडी आणि त्यावर वर्क असणारं ब्लाऊज असा लूकही छान दिसतो.6 / 7राधिका मर्चंट अंबानी हिने तिच्या लग्नात हळदीच्या कार्यक्रमात केलेला हा लूकही खूप गाजला होता. अशी फ्लोरल ओढणीही आता बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते.7 / 7जर साडी ऐवजी ड्रेस घालणार असाल तर असा शरारा पॅटर्न ड्रेसही घेऊ शकता. सध्या असा ड्रेस खूप ट्रेण्डिंग आहे.