1 / 7आपल्या हळदीत आपणही सुंदर दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटत असते. हळदीच्या दिवशी अनेकजण सोन्याचे किंवा साडीला शोभतील अशी मॅचिंग ज्वेलरी परिधान करतात. परंतु, त्याला हळदी लागल्याने ज्वेलरी खराब होते. (Haldi function look for women)2 / 7जर आपले देखील लग्न-हळदी असेल तर सोन्याचे किंवा इतर दागिने घालण्याऐवजी आपण फुलांपासून तयार केलेली ज्वेलरी परिधान करु शकतो. हे दागिने आपल्या साडीला किंवा लेहेंग्यासोबत मॅचही करतील, जास्त जडही वाटणार नाही. पाहूया सिंपल- युनिक आयडिया. (Floral jewellery for Haldi ceremony)3 / 7आपल्याला युनिक ज्वेलरी हवी असेल तर मोगऱ्यापासून ज्वेलरी तयार करु शकतो. मोगऱ्यापासून मागंटिका, कानातले, गळ्यातले, हातातील बांगड्या बनवून सौंदर्य वाढवता येईल. आपल्या रंगानुसार फुले निवडू शकतो. 4 / 7हळदीच्या दिवशी वेस्टन लूक हवा असेल तर आपण ऑर्किडच्या फुलांपासून बनवलेले दागिने निवडू शकतो. ऑर्किडची फुले सुंदर दिसतात. ऑर्किडच्या फुलांपासून गळ्यातले, बांगड्या, मांगटिका आणि पायातले पैंजण तयार करु शकतो. ऑर्किडपासून तयार केलेली ज्वलेरी बाजारातही मिळते. 5 / 7लग्न समारंभात मोगरा आणि गुलाबाला अधिक मागणी असते. हळदीच्या दिवशी या दोन फुलांपासून आपण दागिने बनवू शकतो. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात अधिक भर पडेल. 6 / 7बेबी ब्रेथ आणि गुलाबाच्या फुलांपासून आपण दागिने तयार करु शकतो. यामुळे नवीन नवरीचे सौंदर्य अधिक उजळून निघेल. 7 / 7जिप्सी, गुलाबाची फुले, मोगरा, ऑर्किड्स, झेंडूच्या फुलांपासून आपण वेगवेगळी फुलांची ज्वेलरी तयार करु शकतो.