1 / 6आजकाल फॅशन, मेकअप आणि कपड्यांइतकीच हेअरस्टाईल देखील आपल्या लूकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पण अनेकजण फक्त ट्रेंड पाहून केस कापतात किंवा स्टाइल करतात. पण आपल्या चेहऱ्याचा आकार लक्षात घेत नाहीत. (round face hairstyle)2 / 6गोल चेहरा असणाऱ्यांनी चुकीची हेअरस्टाईल केली तर त्याचा चेहरा अधिक फुगलेला, जाड आणि भप्पका दिसू लागतो. इतकेच नाही तर वय देखील जास्तीचे दिसू लागते. गोल चेहरा असणाऱ्यांना स्लिम, फ्रेश आणि छान दिसायचे असेल तर अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल करणं टाळा. (hairstyles for round face women)3 / 6जर आपला चेहरा गोल असेल तर स्टायलिस्ट स्ट्रेट आणि मध्यभागी केस एकत्र करणं टाळण्याचा सल्ला देतात. यामुळे आपला चेहरा लहान आणि जाड दिसतो. 4 / 6गोल चेहऱ्यावर खूप छोटे केस किंवा बॉयकट केल्यास चेहऱ्याचा पूर्ण आकार दिसतो. त्यामुळे गाल अधिक फुगलेले दिसतात. हेअरस्टाईलमुळे चेहऱ्याला फ्रेम मिळणं सगळ्यात जास्त आवश्यक असतं. 5 / 6गोल चेहऱ्यासाठी लाँग लेयर्स किंवा सॉफ्ट स्टेप कट खूप फायदेशीर ठरतात. लेयर्समुळे चेहरा लांब दिसतो आणि वजन देखील कमी दिसते. कानाच्या खाली असणाऱ्या लेयर्स चेहरा बॅलेन्स करण्यास मदत करतात. 6 / 6साइड पार्टिंग, सॉफ्ट कर्ल्स किंवा वेव्ह्ज केल्याने चेहऱ्यावर डायमेन्शन तयार होतो. यामुळे आपला चेहरा स्लिम आणि अधिक यंग दिसतो. साधी पोनीटेल करतानाही पुढचे केस मोकळे ठेवा.