Gudi Padwa 2022 : गुढीपाडव्याला ट्राय करा लेटेस्ट साडी पॅटर्न्स; पारंपरिक तरीही मॉर्डन लूकसाठी १० टिप्स
Updated:March 30, 2022 15:07 IST2022-03-29T19:36:26+5:302022-03-30T15:07:09+5:30
Gudi Padwa 2022 : गुढीपाडव्यासाठी साडीचे काही पॅटर्न्स दाखवणार आहोत. जेणेकरून तुम्हाला नक्की कसा लूक करायचा आहे हे ठरवणं सोपं होईल.

गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) अवघा काही दिवसांवर राहिला. मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणेज गुढीपाडव्याला घरोघरची बायका मस्त, पारंपारीक लूक करून गुढीचे पूजन करतात. पण कामाच्या गडबडीत त्या दिवशी काय नेसायचं, ज्वेलरी कोणती घालायची याचं प्लॅनिंग करणं राहून जातं. (GudiPadawa 2022 Styling Tips) म्हणूनच या लेखात तुम्हाला गुडीपाडव्यासाठी साडीचे काही पॅटन्स दाखवणार आहोत. जेणेकरून तुम्हाला नक्की कसा लूक करायचा आहे हे ठरवणं सोपं होईल.
1) नववारी साडी
गुढीपाडव्याला तुम्ही पारंपारीक नववारी साडीचा लूक करू शकता. नववारी साडी शिवून मिळाली तर उत्तम किंवा तुम्ही घरच्याघरी कोणाचीतरी मदत घेऊन नववारी साडीचा पारंपारीक लूक करू शकता.
२) पैठणी
गुढीपाडवयाच्या दिवशी तुम्ही लग्नातली किंवा आईची पैठणी नेसू शकता. पैठणीत तुमचा लूक खुलून दिसायला मदत होईल.
३) खणाची साडी
खणांच्या साड्यांची फॅशन सध्या जोरात चालताना दिसते. खणांची, पदरावर सरस्वती, नख असलेली साडी, हिरकणी साडी तुम्ही गुढीपाडव्याला घालू शकता
४) नारायण पेठ
सिंपल, सोबर लूक साठी तुम्ही स्लिव्हजलेस ब्लाऊजवर नारायण पेठ साडी नेसू शकता.
५) बनारसी साडी
कमीत कमी दागिन्यांवर तुम्ही संपूर्ण वर्कने भरलेली बनारसी साडी घालू शकता.
६) कांजीवरम साडी
कांजीवरम साडी सिल्क साडी सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो.
७) जरी साडी
फॅशनेबल जरी साडीवरचा डिसेंट लूक तुमचं सौंदर्यं खुलवू शकतो.
७) खणाची डिजायनर साडी
खणाची साडी, साड्यांवर प्रिंट केलेली सरस्वती, नथ तुमचा लूक अधिक खुलवू शकते.
८) उपाडा सिल्क
साऊथ इंडियन स्टाईल काठाच्या साड्या सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतात.
9) काठापदराची साडी
घरी असलेली कोणतीही काठ पदराची साडी तुम्ही गुढीपाडव्याला नेसू शकता.