1 / 7२०२५ या वर्षात अनेक नवनवीन फॅशन ट्रेंड्स पाहायला मिळाले, यातील काही फॅशन ट्रेंड्स (google trends 2025 celebrity jewellery designs) असे आहेत ज्यांना सर्वसामान्य महिलांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच पसंती दिली आहे. यामध्ये 'ज्वेलरी' म्हणजेच दागिन्यांचा ट्रेंड सर्वात जास्त ट्रेंडिंगवर आहे. सेलिब्रिटींनी त्यांच्या विविध आऊटफिट्ससोबत ज्या पद्धतीचे दागिने घातले, ते सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले आणि पाहता पाहता ते फॅशन स्टेटमेंट बनले.2 / 7सेलेब्सनी स्टाइल केलेले हे युनिक डिझाइन्स ट्रेंडमध्ये आल्यानंतर आता सर्वत्र त्यांचीच (jewellery design trends 2025) चर्चा आहे. जर तुम्हालाही स्वतःला स्टायलिश आणि ट्रेंडी लूक द्यायचा असेल, तर २०२५ मध्ये नक्की कोणते दागिने ट्रेंडमध्ये आहेत आणि कोणत्या डिझाइन्स फॅशनच्या जगात ट्रेंडिंग आहेत ते पाहूयात... 3 / 7 नीता अंबानी यांचा लूक जेव्हा कधी समोर येतो, तेव्हा महिला तो फॉलो करण्यास पसंती देतात. त्यांचे नेकलेस सेट्सदेखील महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. या फोटोमध्ये त्यांनी हेवी डिझाइन असलेला चोकर सेट परिधान केला आहे. यासोबतच मॅचिंग स्टड इअररिंग्स (खड्यांचे कानातले) घालून त्यांनी आपला लूक पूर्ण केला असून, यात त्या अत्यंत देखण्या दिसत आहेत. त्यांच्या या शाही लूकमुळेच हे ज्वेलरी डिझाइन सध्याच्या ज्वेलरी ट्रेंडचा भाग बनले आहे.4 / 7कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) सर्वांच्या नजरा ऐश्वर्या राय आणि तिच्या लुक्सवरच खिळल्या होत्या. तिने आपल्या सुंदर पांढऱ्या साडीसोब हेवी डिझाइन असलेला नेकलेस सेट स्टाइल केला होता. यामध्ये त्यांनी चोकर सेटसोबत एक लांब लेयर नेकलेस घातला होता, तसेच हातामध्ये एक आकर्षक रिंग देखील घातली होती. या दागिन्यांमुळे तिचा लूक एखाद्या 'महाराणी' सारखा शाही दिसत होता. महिलांनी तिच्या या लूकला आणि दागिन्यांच्या निवडीला मोठी पसंती दिली असून त्याचा ट्रेंड ठरला आहे. 5 / 7हिना खानचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो, मात्र तिचे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी (Oxidized Jewelry) डिझाइन्स सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत. महिलांनी हिना खानच्या या दागिन्यांच्या निवडीला विशेष पसंती दिली आहे. तिने लॉन्ग नेकलेस सेटपासून ते आकर्षक चोकर नेकलेसपर्यंतचे विविध ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घालून आपले फोटो शेअर केले आहेत. तुम्हाला जर इंडो-वेस्टर्न किंवा पारंपारिक लूक हवा असेल, तर तुम्ही हिना खानचा हा ज्वेलरी ट्रेंड नक्कीच फॉलो करू शकता.6 / 7यंदा सेलिब्रिटींनी 'मिनिमल ज्वेलरी' (Minimal Jewelry) म्हणजेच साध्या पण मोहक दागिन्यांना सर्वाधिक पसंती दिली आहे. हा ट्रेंड सध्या फॅशन जगतात खूप लोकप्रिय झाला असून महिलांनी याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. 'कमीतकमी दागिन्यांमध्ये जास्तीत जास्त उठावदार दिसणे' ही या ट्रेंडची खासियत आहे. जर तुम्हालाही यंदा तुमचा लूक स्टायलिश बनवायचा असेल, तर तुम्ही देखील हा ट्रेंड फॉलो करु शकता. विशेषतः गोल्ड ज्वेलरी डिझाइन्समध्ये तुम्ही मिनिमल दागिने निवडून तुमचा लूक अधिक आकर्षक करु शकता. ऑफिस वेअर असो किंवा एखादा छोटा कार्यक्रम, हा लूक प्रत्येक ठिकाणी उठून दिसतो.7 / 7२०२५ मधील हे काही ज्वेलरी डिझाइन्स आहेत, जे सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत आणि ज्यांना सेलिब्रिटींनीही विशेष पसंती दिली आहे. तुम्ही देखील या वर्षात अशा प्रकारचे दागिने घालून अधिक सुंदर व आकर्षक दिसू शकता. फक्त दागिन्यांची निवड बदलून तुम्ही तुमचा संपूर्ण लूक अधिक स्टायलिश करु शकता.