1 / 6सणासुदीचे दिवस आता सुरू झाले आहेत. त्यामुळे वारंवार साडी नेसावी लागतेच. अशावेळी साधीच साडी जर तुम्ही थोडी ट्रिकी पद्धतीने नेसली तरी तुम्हाला खूप छान माॅडर्न लूक मिळू शकतो. त्यासाठीच या काही टिप्स पाहा..2 / 6साडी विथ बेल्ट हा ट्रेण्ड सध्या आहेच. साडीच्या काठांना मिळता जुळता बेल्ट घ्या आणि साडी नेसल्यावर तो लावा. साधीच साडीसुद्धा खूप आकर्षक दिसेल.3 / 6साडी विथ जॅकेट असंही तुम्ही करू शकता. साडीवर जॅकेट घातल्यावर तुमचा लूक पुर्णपणे बदलून जातो. यावर सगळे ट्रेण्डी दागिने घाला. खूप आकर्षक लूक मिळेल.4 / 6घागरा साडीही तुम्ही नेसू शकता. साडीच्या निऱ्या एकाच ठिकाणी न खोचता त्या पुर्ण गोलाकार खोचायच्या यामुळे साडीला घागऱ्याचा लूक येतो. त्यावर मॅच होणारी एखादी ओढणी घ्यायची आणि ती बेल्ट लावून पदराप्रमाणे पिनअप करायची. 5 / 6अशा पद्धतीच्या साडीला केप साडी म्हणतात. या साडीवर सुद्धा जॅकेट घातलं जातं, पण ते जवळपास गुडघ्यापर्यंत लांब असतं. साडीवर मॅच होणारं असं जॅकेट तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.6 / 6धोती साडीचाही सध्या ट्रेण्ड आहे. खासकरून नवरात्रीत दांडिया खेळायला जाणार असाल तर अशा पद्धतीची धोती साडी तुम्ही नेसू शकता.