Join us

महागड्या-आवडत्या साड्यांना द्या नवा डिझायनर लूक! पाहा ड्रेसेसचे एकसेएक पॅटर्न- साडीचं नवं रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 18:07 IST

1 / 8
वर्षानुवर्षे त्याच त्या साड्या वापरुन आईला किंवा आजीला कंटाळा आलेला असतो. पण या महागड्या साड्या फेकून द्यायच्या जीवावर येते. अशाच साड्यांचे छान ड्रेस शिवले तर त्यांचा वापरही होतो आणि हे ड्रेस दिसतातही छान
2 / 8
काठापदराच्या या साड्यांचा पारंपरिक लूक आहे तसाच ठेवून ते फॅशनेबल डिझाईनमध्ये शिवल्यास ते जुन्या साडीचे आहेत असे वाटतही नाही. हल्ली अशा साड्यांपासून केलेल्या घेरदार ड्रेसची बरीच फॅशन असल्याचे पाहायला मिळते.
3 / 8
उन्हात, पावसाळ्यात साडी नेसणे, साडी नेसून एका ठिकाणहून दुसरीकडे जाणे आणि एखाद्या समारंभासाठी दिवसभर ही साडी कॅरी करणे हे काम काहीसे आवघडच असते. अशावेळी पटकन ड्रेस घातला तर आपण सगळ्यांमध्ये उठूनही दिसतो.
4 / 8
साडीचा रंगा गडद असेल आणि साडीला छानसा वेगळा पदर असेल तर ड्रेस शिवतानाही बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन्स करता येतात. गळ्याला आणि खालच्या बाजूला तसेच बाह्यांना काठाचा आणि पदराचा वापर केला की हे ड्रेस अतिशय सुंदर दिसतात.
5 / 8
साडीच्या काठांचाही कल्पकतेने वापर करुन शिवलेले हे साडीचे ड्रेस सध्या फॅशन इन आहेत. सणाला किंवा एखाद्या समारंभाला आपण हे ड्रेस आवर्जून घालू शकतो.
6 / 8
स्लिव्हलेस किंवा मोठ्या बाह्याची फॅशन, ड्रेसचा घेर आणि डिझायनर गळा यामुळे या ड्रेसला डिझायनर लूक येतो. त्यामुळे ड्रेस जुन्या साडीचा शिवलाय असेही वाटत नाही.
7 / 8
ओढणीऐवजी जॅकेट पॅटर्न केला तर या ड्रेसला एक वेगळा लूक येऊ शकतो. त्यामुळे ओढणी कॅरी करायचे टेन्शन तर नाहीच पण कॉन्ट्रास्ट रंगांमुळे तुम्ही खुलून दिसता.
8 / 8
लॉंग ड्रेसबरोबरच अशाप्रकारचे शॉर्ट ड्रेसेसही शिवले तर छान दिसतात. एखाद्या बर्थडे पार्टीला किंवा लहानशा कार्यक्रमाला घालण्यासाठी असे ड्रेस उत्तम पर्याय असतो. यामध्ये फुग्याच्या बाह्या, घेर असे जुने पॅटर्न केले तर ते अधिक खुलून येतात.
टॅग्स : फॅशनब्यूटी टिप्समेकअप टिप्स