Join us

Ganeshotsav 2025: गौरी-गणपतीसाठी खास नथीचा नखरा! नऊवारी साडीवर शोभेल 'असा' लूक- खुलून दिसेल सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 18:49 IST

1 / 6
गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा नव्हे तर परंपरेच्या सौंदर्याचा उत्सवही आहे. या दिवसांत महिलांचा लूक साडी, नथ, ज्वेलरी आणि गजऱ्याने अधिक खुलतो. खास करून नऊवारी साडी आणि पारंपरिक नथ हा लूक गणेशोत्सवात प्रत्येकाला मोहवून टाकतो. (Nose ring styling tips)
2 / 6
पारंपरिक साजशृंगारात शोभणारी ही शैली आजही तितकीच आकर्षक वाटते. चला तर मग पाहूया काही सोप्या ट्रेडिंग नऊवारी आणि नथ लूक (Traditional Maharashtrian look)
3 / 6
लूप-स्टाईल नथ ही आधुनिक आणि पारंपारिक डिझाइन आहे. ही लूप-आकाराची सोन्याची नथ ज्यावर लहान मोती आणि लाल मणी आहेत. जे आपण कोणत्याही नऊवारी साडीवर घालू शकतो.
4 / 6
जर आपल्याला पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक हवा असेल तर दगडी नथ ट्राय करु शकतो. हा आपल्याला शाही लूक देईल. पैठणी किंवा चंदेरी साडीसोबत आपण ही नथ घालू शकतो.
5 / 6
मोती आणि हिरव्या दगडी नकाची गोल नथ ही महाराष्ट्रीयन लूकमध्ये अधिक आकर्षण वाढवते. नथवरील हिरवे मणी आणि लटकणारे मणी शाही लूक देतात. नथाच्या चंद्रकोरी आकाराच्या डिझाइनमुळे चेहरा अधिक सुंदर दिसेल.
6 / 6
नऊवारी साडी परिधान केल्यावर महाराष्ट्रीयन नथचा लूक उठून दिसतो. साडीसाठी आपण सोनेरी, लाल, हिरवा किंवा जांभळा रंग निवडू शकतो. यावर आपण पारंपरिक पद्धतीचे दागिने घालू शकतो. नेकलेस, हिरव्या बांगड्या , गजरा आणि नथ घालून महाराष्ट्रीयन लूक पूर्ण करु शकतो. तसेच कपाळावर चंद्रकोर लावू शकतो.
टॅग्स : फॅशन