1 / 11सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह सगळीकडे पसरलेला (Ganpati festival T-shirt ideas) दिसतो. गणपती बाप्पाच्या आगमनाला आणि विसर्जनाला आपण शक्यतो वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पोशाख घालतो. परंतु बदलत्या काळानुसार, टी-शर्ट्स हे सणासुदीच्या दिवसात किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी एक सुंदर आणि आरामदायी पोशाख म्हणून अगदी कम्फर्टेबल आणि सुंदर दिसतात. गणपती उत्सवात तर याची मजा काही वेगळीच असते. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्हीही खास वेगवेगळ्या पद्धतीचे टी-शर्ट्स घालूंन हा उत्सव अधिक आनंदी करू शकता. 2 / 11या गणपती स्पेशल टी-शर्ट्सवरील प्रिंट्समध्ये, गणपतीची वेगवेगळी रुपं, त्याच्या ( Family matching Ganesh T-shirts) आवडत्या गोष्टी किंवा बाप्पावर आधारित काही मजेशीर वाक्य तर काही श्लोक देखील लिहिलेले असतात(Ganesh festival custom T-shirts).3 / 11फक्त तरुणांसाठीच नाही, तर घरातील आजी-आजोबा, आई-वडील आणि लहान मुलांसाठीही असे टी-शर्ट्स उपलब्ध आहेत. यामुळे संपूर्ण कुटुंब एकसारखे कपडे घालून गणपतीची स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ शकतात. हे टी-शर्ट्स फक्त एक फॅशन स्टेटमेंट नसून, कुटुंबातील एकता आणि आनंदाचे प्रतीक बनतात.4 / 11१. आपण घरातील अगदी आत्ताच जन्म घेतलेल्या नवजात बाळासाठी देखील अशा प्रकारचे गणपती बाप्पाचे चित्र व श्लोक असणारे वेगवेगळ्या पॅटर्नचे टी- शर्टस विकत घेऊ शकता. 5 / 11२. याचबरोबर, घरातील आई - वडील, काका - काकी यांच्यासाठी देखील आपण अशा प्रकारचे टी - शर्ट विकत घेऊ शकतो. जर आपल्याला आपल्या पार्टनरसोबत ट्विनिंग करायचे असेल तर असे एकाच पॅटर्नचे दोन टी - शर्ट घेऊन आपण पेअरिंग करु शकतो. 6 / 11३. गणपती बाप्पाचे चित्र किंवा फोटो नको असल्यास आपण अशा प्रकारच्या काही आकर्षक मजेशीर ओळी, किंवा श्लोक असणारे टी - शर्ट नक्की ट्राय करु शकतो. सध्या बाजारांत अशा प्रकारच्या टी - शर्ट्सना फार मोठ्या प्रमाणावर पसंती पहायला मिळते. 7 / 11४. आपण अशा प्रकारचे वेगवेगळे आकर्षक रंग आणि हटके, सुंदर, नाजूक प्रिंट्स असणारे टी - शर्ट नक्कीच विकत घेऊ शकता. यामुळे तुमचा लूक इतरांपेक्षा खूपच खास दिसतो. 8 / 11५. जर आपल्याला थोडासा मॉडर्न किंवा वेगळा लूक हवा असेल तर आपण अशा प्रकारचे काहीतरी हटके आणि आधुनिक टच असणारा असा सेल्फी काढणारा बाप्पा असलेले टी देखील नक्की ट्राय करु शकता. 9 / 11६. याचबरोबर, आई - वडील आपल्या मुलांसोबत देखील अशा प्रकारचे सेम प्रिंट्सचे टी - शर्ट घालूंन पेअरिंग करु शकता. 10 / 11७. लहान मुलांसाठी तर खास एक से बढकर एक प्रिंट्स असलेले टीशर्ट बाजारात फार मोठ्या प्रमाणावर विकले जातात. 11 / 11८. आपण अशाप्रकारे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी एकसारख्याच प्रिंटचे देखील टी - शर्ट निवडू शकता. शक्यतो गणपती आगमन आणि विसर्जनाला अशा प्रकारची हटके थीम ठेवण्याची सध्या फारच क्रेझ पाहायला मिळते.