1 / 12साडी कितीही सुंदर असली तरी तिचा खरा लूक हा ब्लाऊजच्या डिझाईनवर अवलंबून असतो. सध्या बॅक ओपन किंवा बाजूला झिप असलेल्या ब्लाऊजची फॅशन असली, तरी 'फ्रंट हुक' ब्लाऊजचा ट्रेंड कधीच जुना होत नाही. फ्रंट हुक ब्लाऊज हे दिसायला क्लासी तर वाटतातच, पण ते घालण्यासाठी आणि फिटिंगसाठी अत्यंत सोयीस्कर असतात. विशेषतः घाईच्या वेळी हे ब्लाऊज महिलांची पहिली पसंती ठरतात. जर तुम्हीही पुढच्या बाजूला हुक असलेले ब्लाऊज शिवण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या प्रकारचे नेक पॅटर्न त्यावर उठून दिसतील ते पाहूयात(latest front hook blouse patterns).2 / 12सध्या फ्रंट हुक्स ब्लाऊज डिझाईन्स खूप ट्रेंडमध्ये असून, ते केवळ घालायला सोपेच नाहीत तर मॉडर्न आणि एलिगंट लूकही देतात. पारंपरिक आणि वेस्टर्न स्टाइलचा सुंदर मिलाफ असलेले हे ब्लाऊज विविध नेक पॅटर्नमध्ये आणखी उठून दिसतात. जर तुम्ही फ्रंट हुक्स ब्लाऊज शिवण्याचा विचार करत असाल, तर योग्य नेक डिझाईन निवडणं खूप महत्त्वाचं ठरतं. कोणते नेक पॅटर्न फ्रंट हुक्स ब्लाऊजमध्ये सर्वात आकर्षक दिसतात ते पाहूयात. 3 / 12फ्रंट हुक ब्लाऊजमध्ये 'व्ही-नेक' हा सर्वात लोकप्रिय आणि स्टायलिश प्रकार आहे. जर तुम्हाला तुमचे दागिने किंवा नेकलेस हायलाईट करायचा असेल, तर व्ही-नेक उत्तम दिसतो. हा गळा पुढच्या बाजूला थोडा डीप ठेवल्यास तुम्हाला मॉडर्न लूक मिळतो. काठपदर किंवा सिल्क साडीवर हे डिझाईन खूप सुंदर दिसते.4 / 12जर तुम्हाला थोडा रोमँटिक आणि फेमिनाईन लूक हवा असेल, तर स्वीटहार्ट नेक निवडा. फ्रंट हुक ब्लाऊजमध्ये हा पॅटर्न अतिशय सुबक दिसतो. हे डिझाईन तुमच्या खांद्यांना आणि गळ्याला एक विशिष्ट आकार देते. नेटच्या साड्या किंवा पार्टीवेअर साड्यांसाठी हा नेक पॅटर्न सध्या ट्रेडिंग आहे.5 / 12 ज्यांना साधेपणा आवडतो, त्यांच्यासाठी 'सदाबहार' राऊंड नेक हा उत्तम पर्याय आहे. फ्रंट हुकमुळे हा गळा अधिक उठून दिसतो. यावर तुम्ही साडीच्या रंगाची किंवा कॉन्ट्रास्ट रंगाची पायपिंग (Piping) किंवा नाजूक लेस लावून त्याचा लूक अधिक आकर्षक करू शकता. डेली वेअर किंवा ऑफिस वेअर साड्यांसाठी हे डिझाईन बेस्ट आहे.6 / 12 फॉर्मल किंवा एलिगंट लूक हवा असेल, तर फ्रंट हुक ब्लाऊजमध्ये 'स्मॉल कॉलर' किंवा 'मँडरिन कॉलर' वापरून पहा. यामध्ये हुक थोडे वरपर्यंत येतात, ज्यामुळे एक रॉयल लूक मिळतो. सुती (Cotton) किंवा खादी साड्यांवर अशा प्रकारचे कॉलर नेक ब्लाऊज खूपच 'ग्रेसफुल' दिसतात.7 / 12चौकोनी गळा किंवा स्क्वेअर नेक हा रुंद खांदे असलेल्या महिलांवर खूप चांगला दिसतो. फ्रंट हुक ब्लाऊजमध्ये स्क्वेअर नेकमुळे पुढचा भाग सुटसुटीत दिसतो. या डिझाईनमध्ये तुम्ही हुकच्या पट्टीवर छोटे शो-बटन्स किंवा लटकन लावून त्याला अधिक क्रिएटिव्ह बनवू शकता.8 / 12 हा एक क्लासिक प्रकार आहे जो कधीच आऊट ऑफ फॅशन जात नाही. ज्या महिलांना गळ्याचा भाग थोडा ब्रॉड हवा असतो, त्यांच्यासाठी यू-नेक उत्तम आहे. फ्रंट हुक्समुळे या गळ्याचे फिटिंग खूप छान बसते. यावर नाजूक लेस किंवा फ्रिल लावून तुम्ही याला इंडो-वेस्टर्न लूक देऊ शकता.9 / 12हा गळा गोल आणि गळ्याला चिटकून असतो. यात हुक थोडे जवळजवळ आणि वरपर्यंत असतात. नावाप्रमाणेच हा गळा घातल्यावर तुम्हाला गळ्यात दागिने घालण्याची गरज भासत नाही. हेवी एम्ब्रॉयडरी असलेल्या ब्लाऊजसाठी हा पॅटर्न सर्वात बेस्ट आहे.10 / 12 फ्रंट हुक्समध्ये 'अंगरखा' पॅटर्न खूपच रॉयल दिसतो. यात एका बाजूचा भाग दुसऱ्या भागावर ओव्हरलॅप होतो आणि हुक्स थोडे तिरके किंवा मधोमध लपवलेले असतात. पारंपारिक कार्यक्रमांसाठी अंगरखा ब्लाऊज एक परफेक्ट चॉईस आहे.11 / 12बोट नेक आणि फ्रंट हुक्स यांचे कॉम्बिनेशन सध्या फॅशन जगतात खूप 'ट्रेंडी' मानले जाते. नावाप्रमाणेच या गळ्याचा आकार होडीसारखा रुंद आणि उथळ असतो. हे डिझाईन ऑफिस वेअर, फॉर्मल मीटिंग्स किंवा साध्या घरगुती फंक्शन्ससाठी अत्यंत योग्य आहे. यामुळे तुम्हाला एक सोबर आणि एलिगंट लूक मिळतो. फ्रंट हुक्समुळे बोट नेक ब्लाऊजचे फिटिंग खांद्यापाशी व्यवस्थित बसते आणि गळा वारंवार सरकण्याची भीती राहत नाही. जर तुम्ही कॉटन, लिनन किंवा खादी साडी नेसणार असाल, तर 'बोट नेक विथ फ्रंट हुक' ब्लाऊज नक्की ट्राय करा. यावर तुम्ही हुकच्या पट्टीवर साडीच्या रंगाचे छोटे शो-बटन्स लावून त्याला अधिक डिझायनर लूक देऊ शकता.12 / 12लहान मुलांच्या फ्रॉकला असते तशी गोल कॉलर आजकाल ब्लाऊजमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. फ्रंट हुक्स असलेल्या ब्लाऊजवर ही कॉलर खूप क्युट आणि मॉडर्न दिसते. इंडो-वेस्टर्न साड्या, प्रिंटेड कॉटन साड्या किंवा हाय-टी पार्टीसाठी हा लूक बेस्ट आहे.