Join us
Daily Top 2 Weekly Top 5

केस छोटे असो किंवा मोठे... 'या' हेअर ॲक्सेसरीज वापरा, हेअरस्टाईल मस्त होऊन सगळ्यांत उठून दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2025 16:28 IST

1 / 10
लग्नसराईचे दिवस आता लवकरच सुरू होत आहेत. त्यामुळे होणारी नवरी असो किंवा मग नवरा, नवरीच्या करवल्या असो... या काही हेअर ॲक्सेसरीज तुमच्याकडे असायलाच हव्या.. कारण या ॲक्सेसरीज वापरल्यामुळे हेअरस्टाईल जास्त खुलून दिसते.
2 / 10
अशा पद्धतीच्या क्लिप्स बाजारात मिळतात. तुमच्या हेअरस्टाईलनुसार अशा कितीही क्लिप्स लावून तुम्ही छान स्टाईल करू शकता.
3 / 10
केस मोकळे सोडणार असाल तर हे लटकन वापरून पाहा. केसांना मागच्या बाजुने छान लूक येईल.
4 / 10
फुलांचे गजरे तर केसांवर छानच दिसतात. पण आता अशा पद्धतीच्या आर्टिफिशियल गजऱ्यांचाही टेण्ड आला आहे. हे गजरेही केसांवर खूप मस्त दिसतात.
5 / 10
साध्या यु पिन्स मध्येही आता असे कित्येक वेगवेगळे प्रकार आले आहेत. त्यात तुम्हाला पाहिजे ते डिझाईन मिळू शकतं.
6 / 10
मराठमोळी आंबाडा हेअरस्टाईल करायची असेल तर अशा पद्धतीची खोपा पिन तुमच्याकडे असायलाच हवी.
7 / 10
केस छान लांब आणि दाट असतील तर त्यांची वेणी घालून तुम्ही त्यावर अशा क्लिप्स लावू शकतात. यातही कित्येक प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स मिळतात.
8 / 10
जर साऊथ इंडियन लूक करायचा असेल तर अशा पद्धतीची वेणी घ्या. ही तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईटवरही मिळू शकते.
9 / 10
मारवाडी, राजस्थानी गेटअप करायचा असेल तर केसांच्या या ॲक्सेसरीज तुमच्याकडे असायलाच हव्या.
10 / 10
घागरा, वन पीस किंवा वेस्टर्न गाऊन घालून थोडी ट्रेण्डी हेअरस्टाईल करायची असेल तर केसांना अशा पद्धतीची क्लिप लावा. यामध्येही खूप वेगवेगळे डिझाईन्स मिळतात.
टॅग्स : शुभविवाहब्यूटी टिप्समेकअप टिप्सखरेदीफॅशन