1 / 7लग्नसमारंभ किंवा सण असेल तर आपल्यापैकी अनेकजण साडी नेसतात. फॅशनच्या जगात रोज काही ना काही बदल होत असतात. नवनवीन ट्रेंड येत असतात आणि काही दिवसांत ते लुप्त देखील होतात. परंतु काही साड्या अशा असतात ज्यांचे सौंदर्य आणि क्रेझ कधीच कमी होत नाही. (evergreen sarees for women)2 / 7आपल्यालाही काही कार्यक्रमात रॉयल, एलिंगट दिसायचे असेल तर या ५ प्रकराच्या एव्हरग्रीन साड्या आपल्याकडे असायलाच हव्या. (saree fashion trends India)3 / 7बनारसी साडी ही जरीकाम, कापड आणि शाही लूक हे त्याचे वैशिष्ट्य आहे. लग्न असो किंवा काही खास कार्यक्रम कोणत्याही प्रसंगी आकर्षक लूक तयार करता येतो. यात लाल, मरुन, हिरवा आणि सोनेरी रंग अधिक लोकप्रिय असतो. 4 / 7दक्षिण भारतातील कांजीवरम साड्या या आपल्याला सुंदर आणि शाही लूक देतात. यात बॉर्डर असल्यामुळे अधिक खुलून दिसतात. 5 / 7ज्यांना जड साड्या नेसायला आवडत नाहीत, त्यांच्यासाठी चंदेरी साडी हा चांगला पर्याय आहे. सिल्क आणि कॉटनच्या मिश्रणातून तयार केलेली साडी वजनाला अतिशय हलकी असते. 6 / 7महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी ही प्रत्येक महिलेला हवी असते. पदरावर सुंदर मोराची नक्षी आणि राजेशाही थाट असतो. पण ही कधीही नेसू शकतो. 7 / 7कॉटन किंवा लिनन साडी ही प्रत्येकाच्या कपाटात असायला हवी. प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी नेसण्यासाठी सोपी असते. यावर आपण सुंदर डिझायनर ब्लाऊज निवडू शकतो.