Join us

सणउत्सवात ऑफिसला जाताना घाला ‘ही’ मंगळसूत्रं- सुंदर नाजूक डिझाइन्स-पारंपरिक लूकही शोभेल आणि दिसाल परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2025 17:06 IST

1 / 6
सणासुदीच्या काळात आपल्याला नटायला अधिक आवडतं. पण सोन्याचे किंवा महागातले, अधिक जड असणारे दागिने, मंगळसूत्र तासन्तास घालून बसणं खरंतर कठीणच. रोज मोठे लांबलचक मंगळसूत्र घालायचे नसेल किंवा वर्किंग वुमन असाल तर मंगळसूत्राच्या या सिंपल डिझाईन्स आपण वापरु शकतो. (office wear mangalsutra)
2 / 6
मंगळसूत्र हा असा दागिना आहे, जो लग्न झालेल्या स्त्रीला घालावा लागतो. पण ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी काही युनिक सिंपल डिझाईन्स सांगणार आहोत. दिवाळीत लक्ष्मीपूजन किंवा कोणत्याही सणवारात सहज घालू शकतील. ज्यामुळे त्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. (lightweight mangalsutra design)
3 / 6
सणासुदीच्या काळात आपल्याला अधिक स्टायलिश लूक हवा असा असेल तर पेंडंट मंगळसूत्र घालू शकतो. यात डायमंड देखील असतात. जर आपल्याला इंडो- वेस्टन लूक हवा असेल तर हे नक्की ट्राय करु शकता.
4 / 6
सध्या अनेक महिलांना छोटे पण सुंदर असं मंगळसूत्र हवं असतं. त्यासाठी आपण सोनेरी रंगाचं बॅगेट मंगळसूत्र निवडू शकतो. काळेमणी, गोल्डन चैन आणि डायमंडच पेंडंट शोभून दिसेल.
5 / 6
जर आपण दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणात पार्टीला किंवा नातेवाईकांकडे जात असू तर सोन्याच प्लेटिंग केलेलं, काळ्या मण्यांची साखळी असलेल आणि मध्यभागी हिऱ्याचं पेंडंट असलेल मंगळसूत्र निवडू शकतो. यामुळे आपला लूक अधिक छान दिसतो.
6 / 6
आपल्याला लांब पण पारंपरिक लूक हवा असेल तर साखळी डिझाइन असलेले मंगळसूत्र निवडू शकतो. यामुळे आपला लूक अधिक सुंदर दिसेल. यात लांब साखळी आणि काळ्या मणी छान दिसतात. यात फुलपाखराची डिझाइन अधिक छान वाटेल.
टॅग्स : दिवाळी २०२५फॅशनमहिला