1 / 7दिवाळीच्या सणात आपण नवीन कपडे, दागिन्यांसह इतर गोष्टींची देखील खरेदी करतो. अनेकदा आपल्याला कपडे किंवा दागिने आवडले की घेतो. पण ते आपल्या स्किन टोन किंवा त्वचेच्या आकारानुसार शोभतील का असा प्रश्न देखील आपल्याला पडतो. 2 / 7प्रत्येकाचा चेहऱ्याचा आकार वेगळा आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपल्याला सुंदर दिसतील असं नाही. चेहऱ्यानुसार आपण ज्वेलरी किंवा कपड्यांची खरेदी केली तर आपला लूक अधिक सुंदर दिसेल. आपल्याला कपड्यांचा रंग किंवा मेकअप सूट होतो. पण दागिन्यांच्या वेळी नेमकं काय करावं समजत नाही. 3 / 7आपलाही चेहरा गोल असेल आणि अशावेळी नेमकी कोणती ज्वेलरी घालायला हवी. असा प्रश्न पडला असेल तर काही टिप्स लक्षात ठेवा. 4 / 7जर आपला चेहरा गोल असेल तर चोकर किंवा मानेजवळ घट्ट असणारे नेकलेस टाळावेत. यामुळे चेहरा जड दिसतो. त्याऐवजी क्वीन नेकलेस, व्ही आकाराचे नेकलेस आणि लेयर्ड नेकलेस घाला. 5 / 7आपला चेहरा गोल असेल तर मोठ्या आकाराचा मांग टिका किंवा जाड माठपट्टी घालणे टाळा. यामुळे आपला चेहरा लहान किंवा मोठा दिसू शकतो. त्याऐवजी लहान मांगटीका आणमि पातळ माठपट्टी घाला. 6 / 7आपण मोठे, गोलाकार कानातले घालणे टाळायला हवं. त्याऐवजी ड्रॉप कानातले, झुमके किंवा थोडे लांब कानातले घालायला हवे. हे आपल्या चेहऱ्याच्या आकाराची लांबी वाढवतात. 7 / 7दागिन्यांसोबत आपण ब्लाऊज किंवा आपण परिधान केलेल्या कोणत्याही पोशाखाच्या नेकलाइनकडे लक्ष द्यायला हवं. जास्त घट्ट किंवा गोल नेकलाइन घालणं टाळा. व्ही नेकलाइन किंवा डीप नेकलाइन असलेले ब्लाऊज घाला.