Diwali 2025 lakshmi pujan : लाडक्या चिमुकल्या लेकीसाठी खणाचे फ्रॉक आणि खणाची साडी, पाहा ५ सुंदर प्रकार
Updated:October 13, 2025 17:52 IST2025-10-13T17:37:25+5:302025-10-13T17:52:40+5:30
Traditional frock for kids: Abhyang Snan special outfit: Diwali pahat outfits: Khana-saree frock: Diwali 2025 lakshmi pujan: यंदा दिवाळीत लेकीसाठी छान खणाचा पारंपरिक फ्रॉक शिवून घ्या.

दिवाळी हा फक्त दिवे, फराळाचा सण नाही तर परंपरा जपण्याचा सण देखील आहे. या पारंपरिक सणात लहान मुलांचे आकर्षित, देखणे कपडे सणाची शोभा वाढवतात. महाराष्ट्रातील काही भागात दिवाळी पहाट किंवा अभ्यंगस्नान आजही केले जाते. या दिवशी लहानग्यांसाठी खणाचे आणि साडीचे पारंपरिक फ्रॉक घालून सण साजरा करु शकतात. (Abhyang Snan special outfit)
यंदा दिवाळीत लक्ष्मी पूजन किंवा दिवाळी पहाटसाठी लेकीसाठी छान खणाचा पारंपरिक फ्रॉक शिवून घ्या. या मराठमोळ्या पारंपरिक पेहरावात तुमची लेक खूप छान दिसेल. (Diwali pahat outfits)
आपण जुन्या साडीचा सुंदर फ्रॉक शिवू शकतो. ज्यावर निळ्या रंगाचा बो लावू शकतो. ज्यात आपली लेक सुंदर दिसेल.
हिरव्या रंगाचे पोलक आणि जांभळ्या रंगाचा खणाचा परकर शिवू शकता.
आपण साध्या साडीचा पिवळ्या रंगाचा फ्रॉक शिवून त्याला हिरव्या रंगाची बॉर्डर लावू शकतो. हा कॉन्ट्रास्ट मॅच होईल.
पिवळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाची बॉर्डर असलेली पैठणी साडीचा फ्रॉक आपण मुलीसाठी शिवू शकतो. हाताला झालर लावू शकतो.
दिवाळीत पारंपरिकतेचा गोडवा हवा असेल तर लाल रंगाच्या पैठणीचा फ्रॉक आपण शिवू शकतो. त्याच रंगाचा बो लावल्यावर आणखी सुंदर दिसेल.