प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

Updated:November 15, 2025 20:33 IST2025-11-15T20:17:05+5:302025-11-15T20:33:33+5:30

different types of necklaces set every lady must have : different types of necklaces : must have necklaces for women : लग्न असो किंवा सणवार, ६ ज्वेलरी सेट देतील स्टायलिश, क्लासिक लूक! तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये यातील कोणते सेट आहेत पाहा..

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

सणवार, लग्न समारंभ किंवा कोणताही खास प्रसंग असो, भारतीय स्त्रियांची पहिली पसंती (different types of necklaces set every lady must have) नेहमी साडीलाच असते. साडीचे सौंदर्य, तिची नजाकत आणि पारंपरिकता यामुळे स्त्रियांचे रूप अधिक खुलून दिसते. पण, साडीचा हा संपूर्ण 'लूक' एका गोष्टीशिवाय अपूर्णच असतो, ते म्हणजे दागिने!

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

साडीच्या रंगाशी आणि प्रकाराशी जुळणारे किंवा साडीला शोभून दिसणारे दागिने (must have necklaces for women) घातल्यास, तुमचा संपूर्ण पेहराव उठून दिसतो. अनेकदा शेवटच्या क्षणी दागिने निवडताना गोंधळ होतो. म्हणूनच, प्रत्येक स्त्रीकडे असे ६ खास आणि बहुउपयोगी ज्वेलरी सेट असायलाच हवेत, जे कोणत्याही साडीवर सहज मॅच होतील आणि तुम्हाला कमी वेळात तयार होण्यास मदत करतील. तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये कोणते 'कॉमन' आणि 'एसेंशियल' सेट असणे गरजेचे आहे ते पाहूयात...

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

प्रत्येकीच्या ज्वेलरी बॉक्समध्ये किमान एक तरी मोत्यांचा सेट हवाच. फिक्या रंगाच्या, जॉर्जेट, पॅरा,पारंपरिक मराठमोळ्या नऊवारी किंवा सहावारी साड्यांवर शोभून दिसतो, इतकेच नाही तर कॉटन सिल्कच्या साड्यांवर देखील मोत्यांचा सेट परफेक्ट मॅचिंग होतो. मोत्यांचा पांढरा रंग जवळपास प्रत्येक रंगाच्या साडीवर शोभून दिसतो आणि तो नेहमीच क्लासिक मानला जातो.

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

व्हाईट स्टोनचा AD सेट हा प्रत्येकाच्या ज्वेलरी बॉक्समधील सर्वात उत्तम पर्याय आहे. कोणत्याही रंगाच्या साडीवर हा शोभून दिसतो.

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

कॉटन, खादी, इकत किंवा हँडवर्क असलेल्या नक्षीकाम केलेल्या साड्यांवर हा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सेट परफेक्ट मॅचिंग होतो. यामुळे संपूर्ण लुकला एक ट्रेंडी विंटेज टच मिळतो. हा सेट खास करून तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे.

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

हेवी साड्या, कांजीवरम किंवा सिल्क साड्यांसोबत टेम्पल ज्वेलरी कधीही फेल जात नाही. देवी-देवतांच्या मनोहारी डिझाईन्समुळे हा सेट सणवार, लग्नकार्य, खास प्रसंग अशावेळी “मस्ट हॅव”.

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

लग्न समारंभ, सणवार अशा खास प्रसंगी किंवा भरजरी सिल्कच्या साड्यांवर हा कुंदन सेट तुमच्या लूकमध्ये अधिक भर घालतो. याचा हेवी आणि रॉयल लुक पारंपरिक पेहरावाला एक खास ग्लॅमरस टच देतो.

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

पारंपरिक पूजा, हळदी समारंभ किंवा जेव्हा तुम्हाला तुमचा लूक पूर्णपणे पारंपरिक लुक हवा असतो, अशावेळी तुम्ही हा नेकलेस घालू शकता. गोल्ड प्लेटेड किंवा अँटिक गोल्ड फिनिश असलेला सेट प्रत्येक भारतीय साडीसोबत परफेक्ट मॅचिंग होतो,

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

साडीतील विशिष्ट रंग जसे की, हिरवा - लाल - गुलाबी हायलाइट होऊन अधिक खुलुनन दिसण्यासाठी आपण साडीवर मीनाकारी सेट घालू शकता. हा सेट तुम्हाला साडीच्या रंगाशी अचूक मॅचिंग होऊन तुमचा लूक अधिक उठून दिसतो.

प्रत्येकीला शोभून दिसणारे ८ ज्वेलरी सेट, दागिने इतके सुरेख की मायेनं घालावे-हौसैनं मिरवावेत...

अनेक साड्यांना मॅच होण्यासाठी असा रंगीबेरंगी मल्टीस्टोन सेट एकदम उपयुक्त. हे एकच सेट तुमच्या अनेक आउटफिट्ससोबत अगदी सहज मॅच होऊन जातो.