1 / 7सणासुदीचे दिवस आले आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये नेसण्यासाठी पैठणी घेणार असाल तर पुढील पद्धतीने त्यावर ब्लाऊज शिवून पाहा. तुमचा लूक बदलून अधिक स्टायलिश, ट्रेण्डी दिसाल. शिवाय अंगावरची महागडी पैठणीही आणखीनच रुबाबदार, देखणी दिसायला लागेल.(designer blouse designs for paithani)2 / 7पैठणीवर पैठणीच्याच कपड्यातलं ब्लाऊज असायला हवं, हा ट्रेण्ड आता मागे पडत आहे. अशा पद्धतीचं जॉर्जेट किंवा ब्रोकेडचं ब्लाऊजही पैठणीवर छान दिसतं.(how to stitch blouse on paithani saree?)3 / 7पैठणीच्या साडीवर खणाचं ब्लाऊज हा ट्रेण्डही आता खूप चालतो आहे. पैठणीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट मॅच होणारं ब्लाऊज त्यासाठी निवडा.(blouse patterns for paithani saree)4 / 7असं एखादं ब्लाऊज घेतलं तर ते तुम्ही कोणत्याही रंगाच्या पैठणीवर घालू शकता. त्यामुळे असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये हवंच.5 / 7अशा प्रकारच्या ब्लाऊजचाही सध्या खूप ट्रेण्ड आहे. कधी कधी साडी तर नेसायची असते पण त्यावर एकदम ट्रॅडिशनल लूक नको असतो. थोडा स्टायलिश लूक हवा असतो. त्यावेळी मग अशा पद्धतीचं ब्लाऊज तुमचा लूक बदलून टाकण्यासाठी नक्कीच उपयोगी येऊ शकतं. 6 / 7पैठणीच्या बाह्या आणि साडीचा रंग जो आहे त्या रंगाचं ब्लाऊज असं कॉम्बिनेशन असणारे ब्लाऊजही पैठणीवर खूप मस्त दिसतं. 7 / 7कोणत्याही रंगाच्या पैठणीवर तिच्या रंगाची कॉन्ट्रास्ट असणारं जरीचं ब्लाऊजही खूप परफेक्ट दिसतं. तुम्ही काही वेगळंच, भलतंच घातलं आहे, असं अजिबात वाटत नाही. एकदा असंही ट्राय करून पाहा.