Join us   

हाय रे तेरा झुमका! नवरीसाठी खास कानातल्यांचे ७ सुंदर डिझाईन्स, पर्सनलाइज्ड कानातले पाहूनच पडाल प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 3:05 PM

1 / 8
कस्टमाईज मंगळसूत्र, कस्टमाईज अंगठी, कस्टमाईज साडी पिन किंवा ब्रोच, कस्टमाईज कानातले अशा पर्सनल टच असलेल्या दागदागिन्यांचा ट्रेण्ड सध्या खूप वाढतो आहे. अशा कस्टमाईज ॲक्सेसरीजमुळे दागदागिन्यांची शोभा आणि ते घालणाऱ्या व्यक्तींचा आनंद आणखी वाढतो.
2 / 8
हल्ली लग्नाच्या निमित्ताने मेहेंदी, हळद, संगीत असे वेगवेगळे कानातले असतात. अशा कार्यक्रमांना घालण्यासाठी हल्ली नवरी त्यांचे किंवा त्यांच्या नवऱ्याचे नाव असलेले कस्टमाईज कानातले करून घेत आहेत.
3 / 8
मेहेंदीचा कार्यक्रम असेल तर अशा हिरव्या रंगातल्या कानातल्यांना प्राधान्य दिले जाते. हळदीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या साडीवर मॅच करण्यासाठी असे पिवळे कानातले मिळतात.
4 / 8
कस्टमाईज कानातल्यांसोबतच बिंदी आणि गळ्यातला हार देखील मिळत आहे. तुमच्या शहरातल्या लोकल मार्केटमध्ये तर हे असे कस्टमाईज दागिने तर मिळतीलच. पण अनेक ऑनलाईन शॉपिंग साईटवरही हे दागिने मिळत आहे.
5 / 8
साधारणपणे २०० ते ५०० रुपये यादरम्यान या कस्टमाईज कानातल्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात.
6 / 8
फक्त नवरीसाठीच नाही तर नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांसाठीही असे दागिने मिळत आहेत.
7 / 8
कस्टमाईज कानातल्यांचं हे बघा एक आणखी सुंदर डिझाईन. अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये पर्सनल टच असणारे अनेक प्रकार बाजारात मिळतात.
8 / 8
टॅग्स : फॅशनलग्नखरेदीदागिने