1 / 8ओढणीचा ड्रेस शक्यतो एकाच कलर पॅटर्नचा असतो. कुर्ता वेगळ्या रंगाचा पॅण्ट आणि ओढणी समान रंगाची. मात्र या पेक्षा वेगळी काही तरी फॅशन करायची असेल तर कॉन्ट्रास्ट ड्रेस नक्की ट्राय करा. 2 / 8जांभळ्या रंगाची ओढणी आणि गडद हिरव्या रंगाचा ड्रेस हे कॉम्बिनेशन फेअर स्किन टोनसाठी अगदी मस्त आहे. फार सुंदर दिसते. 3 / 8लाल रंग सगळेच वापरतात मात्र तांबडा रंग त्याहून सुंदर दिसतो. तांबड्या रंगाची जरीची ओढणी आणि एखाद्या फिक्या रंगाचा ड्रेस जसे की पांढरा किंवा ऑफ व्हाईट, हे कॉम्बिनेशन डेली वेअरसाठी अगदी छान आहे. 4 / 8बांधणी पॅटर्नमध्ये गुलाबी रंग अगदी आरामात कुठेही मिळून जातो. बांधणीची गुलाबी ओढणी पिवळ्या रंगावर तसेच लेमन रंगावर अगदी सुंदर दिसते. एखाद्या कार्यक्रमासाठी असे कॉम्बिनेशन घालायला काहीच हरकत नाही. 5 / 8त्याच त्याच रंगाचा सेम लेहेंगा घालून कंटाळा आला असेल तर आता कॉन्ट्रास्ट ओढणी असलेला एक रंगी लेहेंगा नक्की घालून पाहा. फिक्या रंगाचा ड्रेस आणि त्याच रंगातील गडद ओढणी फार सुंदर दिसते. जसे की हिरवट ड्रेस आणि नीळी गडद ओढणी एकत्र छान दिसतात. 6 / 8फिकट ड्रेस आणि गडद ओढणी कॉमन आहे मात्र फिकट ओढणी आणि गडद ड्रेस फार कॉमन नाही. काळा ड्रेस आणि त्यावर गुलाबी ओढणी हा प्रकार अगदी सुंदर दिसतो. 7 / 8ऑफ व्हाईट ओढणी निळ्या रंगावर तसेच जांभळ्या रंगावर हिरव्या रंगावर अगदी छान सुट होते. 8 / 8लाईट पिंक आणि शेवाळी हे कॉम्बिनेशन अगदीच डिसेंट आहे. ऑफीससाठी किंवा कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी अगदी योग्य आहे.