1 / 9बरेचदा आपल्याला केस कापायचे असतात. छान कट करायचा असतो मात्र फार सांभाळावा लागेल असा कट करायची इच्छा होत नाही. साधा हेअरकटही छानच दिसतो. काही किचकट असायलाच हवे असे नाही. पाहा सिंपल हेअर कटसाठी काय करु शकता. 2 / 9मानेच्या जरा खाली केस ठेवायचे असतील तर फेदरकट एकदम मस्त दिसेल. तसेच कुर्ता, साडी, वेस्टर्न साऱ्यावर सुटही होईल. 3 / 9तरुणींना फार प्रिय असणारा कट म्हणजे स्टेपकट. सांभाळायलाही सोपा आणि केस छान वेवीही दिसतात. 4 / 9व्ही कट गोल चेहरा तसेच उभा चेहरा असणार्यांना नक्कीच सुंदर दिसतो. चेहर्याच्या आकारावर खुलून दिसतो.5 / 9बॉबकटला अनेकदा भारतात बॉय कट असेही म्हटले जाते. केस कमी ठेवायला आवडतात. अजिबात बांधायचे कष्टच नको आहेत तर हा कट सगळ्यात मस्त. 6 / 9वुल्फ कटही आजकाल फार चर्चेत असतो. फक्त त्याची जरा काळजी घ्यावी लागते. नाहीतर केस चपट होऊन जातात. 7 / 9स्ट्रेट लेअर कट लांब केसांना सुंदर दिसतो. बांधल्यावरही छान दिसतो आणि सुटे केसही मस्त वाटतात. अनेक जणी हा कट करतात. 8 / 9कर्टन बँग्स म्हणजे अगदीच तरुण मुलींच्या आवडीचा विषय आहे. थोडा फार साधना कट सारखाच दिसतो. समोर कपाळावर केस असतात. 9 / 9फेस फ्रेमिंग लेअर सध्या प्रसिद्ध आहे. ज्यांचे केस जरा कुरळे आहेत त्यांच्यासाठी एकदम मस्त असा कट आहे. चेहराही सुंदर दिसतो.