साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

Updated:September 23, 2025 20:50 IST2025-09-23T20:41:15+5:302025-09-23T20:50:50+5:30

Chaniya Choli Blouse Back Design For Navratri Look : navratri special chaniya choli blouse design : trendy blouse back design for navratri : stylish chaniya choli blouse patterns : best blouse back neck design for navratri : ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे हे डिझाइन्स देतील तुमच्या नवरात्री लुकला सुपरहीट टच...

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

नवरात्रीचे नऊ दिवस 'चनिया चोली' सारखी पारंपरिक वेशभूषा करणे अनेक (Chaniya Choli Blouse Back Design For Navratri Look) महिलांना आवडते. पारंपरिक चनिया-चोलीला खास आकर्षक लुक देण्यासाठी ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे डिझाइन फार महत्वाचे असते. विविध ट्रेंडी आणि स्टायलिश डिझाइन्समुळे पारंपरिक पोशाखाला आधुनिक टच मिळतो आणि तुमचा लुक अजून उठून दिसतो.

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

या नवरात्रीत तुमच्या चनिया-चोलीला ग्लॅमरस लुक देण्यासाठी काही ( best blouse back neck design for navratri) खास मागच्या गळ्याचे डिझाइन नक्कीच उपयोगी ठरतील. या वर्षीच्या नवरात्रीसाठी काही खास ब्लाऊज बॅक नेक डिझाइन्स पाहूयात...

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

१. तुमचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी तुम्ही या प्रकारच्या डोरी बॅक ब्लाऊज डिझाइनची निवड करू शकता. अशा प्रकारच्या बॅक डिझाइन असलेल्या ब्लाउजमुळे तुमचा लुक आणखी चांगला दिसतो आणि तुमच्या सौंदर्याला एक वेगळीच चमक येते.

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

२. या वर्षीच्या नवरात्रीत दांडिया नाईटसाठी तुम्ही तुमच्या चनिया-चोलीच्या ब्लाऊजसाठी मिरर वर्क लेस-अप टाई-बॅक डिझाइन करून घेऊ शकता. अशा प्रकारचे ब्लाऊज बॅक डिझाइन सध्या खूप लोकप्रिय आहेत आणि बहुतेक महिलांना ते खूप आवडत आहेत.

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

३. मल्टिपल डीप कट बॅकलेस ब्लाऊज या पॅटर्नमध्ये ब्लाऊजला मागच्या बाजूने वेगवेगळ्या आकाराचे डीप कट दिलेले असतात. अशी ब्लाऊज डिझाइन तुमच्या सौंदर्यात भर घालेल आणि तुमच्या लुकला अधिक आकर्षक करेल.

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

४. चनिया चोलीच्या ब्लाऊजच्या बॅक डिझाइनला आपण अशा प्रकारे क्रिस क्रॉस डोरी बॅक पॅटर्न देखील शिवू शकता. यासोबत तुम्ही गळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शोभतील अशा ॲक्सेसरीज घालून तुमचा लुक पूर्ण करू शकता.

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

५. ब्लाऊजच्या वेगवेगळ्या बॅक डिझाईन्स सोबतच आपण अशा पद्धतीचा पारंपरिक डीप व्ही नेक पॅटर्नचा ब्लाऊज देखील शिवू शकता.

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

६. जर आपल्याला बॅक ओपन नको असेल तर आपण अशा प्रकारचे, पॅचवर्कचे डिझाईन देखील ब्लाऊजच्या मागच्या बाजूला लावू शकतो. या पॅचवर्कवर वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यांनी केलेलं डिझाईन खूपच सुंदर व आकर्षक दिसते.

साधी चनिया चोलीही दिसेल बहू सरस! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या पाहा सुंदर डिझाइन्स...

७. आपण अशा प्रकारचे चनिया - चोलीला परफेक्ट मॅच होणारे किंवा काँट्रास्ट रंगांचे गोंडे किंवा लटकन देखील लावू शकतो. यामुळे चनिया - चोलीचा लूक अधिकच सुंदर दिसेल.