नवरी नटली!! माधुरी दीक्षित ते आलिया भट, पाहा बॉलीवूड तारकांचे लग्नातले लूक-सुंदर मोहक रुप
Updated:December 20, 2025 19:30 IST2025-12-20T13:23:35+5:302025-12-20T19:30:07+5:30

कित्येक अभिनेत्रींना आपण मोठ्या पडद्यावर नवरीच्या भुमिकेत पाहिलेलं असतं. पण स्वत:च्या लग्नासाठी त्या कशा तयार झाल्या होत्या हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच एक उत्सूकतेचा विषय असतो.
म्हणूनच रिअल लाईफमध्ये नवरी म्हणून पाहा कशा सजल्या होत्या या काही अभिनेत्री.. त्यापैकी कतरिना कैफची ही सुंदर झलक. तिने लाल रंगाचा टिपिकल घागरा घालण्यास पसंती दिली होती.
नुकतीच आई झालेली परिणिती चोप्रा तिच्या लग्नाच्या वेळी अशा मोतिया रंगाच्या सुंदर घागऱ्यात दिसून आली.
नवरीने लग्नात भडक रंगाचे कपडे घातले पाहिजेत हा ट्रेण्ड जणू काही आलिया भटने मोडीत काढला आणि सायलेंट रंगाच्या ब्रायडल कपड्यांचा नवा ट्रेण्ड आणला.
आलिया भटनंतर कियारा आडवाणीही तिच्या लग्नात अशा फिकट गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसून आली.
सोनाक्षी सिन्हाने तिच्या स्वत:च्या लग्नात घालायला अशी गडद लाल रंगाची बनारसी साडी निवडली होती. साडीला शोभून दिसणारी पारंपरिक वेशभुषा, मोठी टिकली आणि मोजके दागिने अशा थाटात सोनाक्षी नवरी म्हणून दिसून आली.
जेनेलियाने मुंडावळ्या बांधून तिच्या लग्नात असा सुंदर मराठी लूक केला होता.
तर मराठमोळी माधुरी दीक्षित नवरी म्हणून अतिशय देखणी, सालस दिसत होती.