Karwa Chauth 2025 : कपाळी कुंकू-हातात बांगड्या-लाल साडी! बॉलिवूड अभिनेत्रींचे पाहा करवा चौथ लूक...

Updated:October 9, 2025 18:08 IST2025-10-09T17:57:48+5:302025-10-09T18:08:21+5:30

bollywood actress karwa chauth look : celebrity karwa chauth outfits : बॉलिवूड अभिनेत्रींचे खास करवा चौथ लूक... दिसतात इतक्या सुंदर की...

Karwa Chauth 2025 : कपाळी कुंकू-हातात बांगड्या-लाल साडी! बॉलिवूड अभिनेत्रींचे पाहा करवा चौथ लूक...

'करवाचौथ' हा सण भारतीय संस्कृतीत विवाहित स्त्रियांसाठी एक विशेष महत्वाचा (bollywood actress karwa chauth look) आणि उत्साहाचा दिवस असतो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर पूजा करून उपवास सोडतात. या खास सणाच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा, सुंदर दागिने आणि आकर्षक मेकअप करून नववधूप्रमाणे तयार होतात. सामान्य गृहिणींपासून ते बॉलिवूडच्या सेलिब्रिटी अभिनेत्रींपर्यंत सर्वचजणी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.

Karwa Chauth 2025 : कपाळी कुंकू-हातात बांगड्या-लाल साडी! बॉलिवूड अभिनेत्रींचे पाहा करवा चौथ लूक...

प्रत्येक वर्षी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी अभिनेत्रींचे करवाचौथ लूक सोशल मीडियावर चर्चेत असतात. डिझायनर साड्यांपासून ते लेहेंगा, आकर्षक दागिने आणि मेकअपपर्यंत, प्रत्येक अभिनेत्री स्वतःच्या स्टाईलने हा सण साजरा करते. बॉलिवूड अभिनेत्रींचे काही खास करवाचौथ खूपच लोकप्रिय झाले ते पाहूयात...

Karwa Chauth 2025 : कपाळी कुंकू-हातात बांगड्या-लाल साडी! बॉलिवूड अभिनेत्रींचे पाहा करवा चौथ लूक...

प्रियांका अनेकदा लाल रंगाच्या डिझायनर साड्यांमध्ये किंवा लेहेंग्यामध्ये दिसते. तिचा लूक पारंपरिक पण मॉडर्न असतो. तिच्या सिंदूर आणि बांगड्यां देखील अतिशय शोभून दिसतात.

Karwa Chauth 2025 : कपाळी कुंकू-हातात बांगड्या-लाल साडी! बॉलिवूड अभिनेत्रींचे पाहा करवा चौथ लूक...

अनुष्का तिच्या साधेपणासाठी आणि एलिगन्ससाठी ओळखली जाते. ती सहसा पेस्टल रंगाच्या किंवा हलक्या वर्क असलेल्या साड्या नेसण्याला प्राधान्य देते. मिनिमल मेकअप, कमी दागिने आणि केसांचा साधा अंबाडा किंवा मोकळे केस तिच्या लूकला क्लासी बनवतात.

Karwa Chauth 2025 : कपाळी कुंकू-हातात बांगड्या-लाल साडी! बॉलिवूड अभिनेत्रींचे पाहा करवा चौथ लूक...

सोनाक्षीने ग्लॅमरस लाल साडीतील आपले फोटो शेअर करत सर्वांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या. तिने खास या सणानिमित्ताने नेसलेली लाल रंगाची साडी मॅचिंग ब्लाऊजसोबत तिच्यावर अधिक खुलून दिसत होती. सोबतच तिने गळ्यात लांब चेन घालून स्टायलिंग केले होते. तिचा लूक मिनिमल असूनही आकर्षक दिसत होता.

Karwa Chauth 2025 : कपाळी कुंकू-हातात बांगड्या-लाल साडी! बॉलिवूड अभिनेत्रींचे पाहा करवा चौथ लूक...

शिल्पा तिच्या फिटनेस आणि स्टाईलसाठी फारच लोकप्रिय आहे. ती शक्यतो डिझायनर साड्या तसेच अनेकदा लाल, गुलाबी किंवा कॉन्ट्रास्ट रंगांच्या साड्या नेसणे अधिक पसंत करते. साडी नेसण्याची तिची खास स्टाईल, हेवी ज्वेलरी आणि तिच्या चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो तिच्या लूकला अजूनच उठावदार बनवण्यास मदत करतो.

Karwa Chauth 2025 : कपाळी कुंकू-हातात बांगड्या-लाल साडी! बॉलिवूड अभिनेत्रींचे पाहा करवा चौथ लूक...

सोनम फॅशन आयकॉन असल्याने, तिच्या करवा चौथ लूकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती कधी पारंपरिक लेहेंग्यात तर कधी मॉडर्न टच असलेल्या साडीत दिसते. तिची ज्वेलरी, हेअरस्टाईल आणि मेकअप नेहमीच तिच्या आउटफिटला साजेशी आणि फॅशनेबल असते.

Karwa Chauth 2025 : कपाळी कुंकू-हातात बांगड्या-लाल साडी! बॉलिवूड अभिनेत्रींचे पाहा करवा चौथ लूक...

कतरिनाने तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या करवा चौथं सणाला लाल आणि गुलाबी रंगाचे मिश्रण असणारी धूप - छाव प्रकारातील ऑरगेंझा साडी नेसली होती. तिचा सिम्पल पण एलिगंट मेकअप खूपच सुंदर दिसत आहे, जो तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्याला उठाव देतो.