1 / 10साडी नेसायला बऱ्याचजणींना फार आवडत. एखादा खास प्रसंग किंवा (Blouse Designs To Hide Tummy Fat) कार्यक्रम असेल तर आपण मोठ्या हौसेने अगदी ठेवणीतल्या साड्या नेसतोच. परंतु काहीवेळा साडी नेसल्यावर पोट उघडे दिसते, किंवा काहीजणींच्या पोटाचा आकार मोठा असल्याने साडी नेसल्यावर पोट कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ते दिसतेच. 2 / 10अशा परिस्थितीत साडी नेसणं गैरसोयीच वाटत, विशेषतः साडीचं सौंदर्य (New & Simple Saree Blouse Designs To Hide Tummy) तेव्हाच खुलून येतं, जेव्हा आपण आत्मविश्वासाने ती नेसतो. त्यामुळे अशावेळी ब्लाऊजच्या अशा काही खास पॅटर्न्सची निवड केली पाहिजे, जे सौंदर्य टिकवून ठेवत पोट झाकण्यासही मदत करतील. 3 / 10यासाठीच, अशाच काही स्टायलिश, ट्रेंडिंग आणि स्मार्ट ब्लाऊज (Blouses that hide tummy) डिझाइन्स पाहणार आहोत, ज्या पोट सहज लपवतील आणि संपूर्ण लुकलाही उठावदारपणा देतील. 4 / 10१. साडी नेसल्यावर पोट दिसू नये म्हणून तुम्ही अशा पॅटर्नचा लॉन्ग लेन्थ कॉलर नेक ब्लाऊजची निवड करु शकता. या पॅटर्नमुळे तुमचे पोटही झाकले जाईल आणि तुमचा लूकही तितकाच खास आणि सुंदर दिसेल. 5 / 10२. पोटाचा घेर साडी नेसल्यावर दिसू नये म्हणून हा फ्रिल पॅटर्नचा ब्लाऊज देखील एक अतिशय उत्तम पर्याय आहे. यात ब्लाऊजला खालच्या बाजूने फ्रिल असते त्यामुळे पोटचा घेर सहज लपवण्यास मदत होते. 6 / 10३. जॅकेट ब्लाऊज हा देखील तुमच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय ठरु शकतो. यात आपण शर्ट किंवा टीशर्टवर घालतो तसेच जॅकेट पॅटर्नचे ब्लाऊज असते. आपण जॅकेट घातल्याप्रमाणेच हा ब्लाऊज घालू शकतो. ट्रेंडी, स्टायलिश आणि बॉसी लूकसाठी हे जॅकेट ब्लाऊज फारच शोभून दिसतील. 7 / 10४. आपण नेहमीपेक्षा थोडे उंचीला लांब असणारे असे कंबरेपर्यंतचा भाग व्यवस्थित कव्हर करणारे लॉन्ग ब्लाऊज देखील शिवून घेऊ शकतो. ज्यात पोट लपले जाईल आणि दिसायलाही स्टायलिश लूक देतील. 8 / 10५. ब्लेझर ब्लाऊज हा सुद्धा पर्याय उत्तम आहे. दिसताना हे ब्लाऊज एखाद्या ब्लेझर कोट सारखेच दिसतात, पण पोट लपवून फॅशनेबल दिसण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. 9 / 10६. शॉर्ट जॅकेट ब्लाऊज अशा पॅटर्नच्या ब्लाऊज मध्ये पोटाचा घेर लपवला जातो, यामुळे पोट न दिसता आपण मॉडर्न व स्टायलिश दिसण्यात मदत होते. 10 / 10७. साडी नेसल्यावर दिसणार पोट लपवण्यासाठी कोठी स्टाईल ब्लाऊज देखील एक उत्तम पर्याय आहे. यात ब्लाऊज कंबरेपर्यंत उंचीला लांब असल्याने पोट सहज झाकले जाते.