आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

Updated:August 7, 2025 21:35 IST2025-08-07T21:30:00+5:302025-08-07T21:35:02+5:30

Blouse Design for Shravan Special Festival Season : Shravan special blouse designs : Blouse designs for festival season : Latest blouse patterns for Shravan festival : श्रावणातील प्रत्येक सणाला चारचौघीत उठून दिसायचं तर पहा हे ब्लाऊजचे भन्नाट पॅटर्न्स..

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

'रक्षाबंधन' हा बहीण - भावांचा खास सण! या दिवशी विशेष करुन (Blouse Design for Shravan Special Festival Season) सगळ्याचं बहिणी अगदी नटून - थटून तयार होतात. एरवी कधी नाही (Shravan special blouse designs) पण या दिवशी बहुतेकजणी साडी नेसणेच पसंत करतात. पण, साडी कितीही सुंदर असली तरी त्याला मॅच होणारा ब्लाऊज सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. आजकाल साडीसोबत मिळणाऱ्या पारंपारिक ब्लाऊजऐवजी अनेक वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड आहे. हे ब्लाऊज तुमचा लूक अधिक स्टायलिश आणि आकर्षक करतात.

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

रक्षाबंधन स्पेशल साडीवर शोभून दिसतील असे वेगवेगळ्या (Blouse designs for festival season) पॅटर्नचे ब्लाऊज डिझाइन्स पाहूयात, जे तुमचा लूक अधिक ग्लॅमरस, हटके आणि ( Latest blouse patterns for Shravan festival) चारचौघीत उठून दिसेल असा करतील. इतकंच नाही तर आपण हे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज श्रावणातील प्रत्येक सणावाराला देखील घालू शकता.

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

मोत्यांच्या सुंदर वर्कने सजवलेला ब्लाऊज, कोणत्याही प्लेन किंवा डिझायनर साडीसोबत मॅच केल्यास लूकला रॉयल टच मिळतो. या प्रकारच्या ब्लाऊजमुळे हेव्ही दागदागिन्यांची गरज भासत नाही, कारण हा ब्लाऊजच तुमचा संपूर्ण लूक अधिक उठून दिसण्यास मदत करतो.

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

व्ही डीप नेक टील ब्लाऊज डिझाइनमुळे तुम्ही तुमचा आवडता हेवी नेकलेसही सहजपणे गळ्यात घालू शकता. याच्या नेकलाइनवर केलेले सुबक नक्षीकाम देखील एखाद्या सुंदर हाराइतकेच उठावदार दिसते. मस्टर्ड, पिवळ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगाच्या साड्यांसोबत हा ब्लाउज आणखी उठून दिसतो आणि तुमचा लूक खास आणि क्लासी बनवतो.

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

हा लाँग जॅकेट ब्लाऊज तुम्ही कुठल्याही साडीसोबत सहजपणे कॅरी करू शकता. साडीला मॅच होणारा सिंपल ब्लाऊज आत घालून त्यावर वेलवेट जॅकेट स्टाईल ब्लाऊज घाला आणि त्यावर साडीचा पल्लू ड्रीप करा. हा हटके आणि रॉयल लूक पाहून प्रत्येकाची नजर तुमच्यावर खिळून राहील आणि तुमचा फॅशन सेन्स सगळ्यांना अगदी कमाल वाटेल.

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

पारंपरिक साडीला मॉडर्न टच द्यायचा असेल, तर हॉल्टर नेक ब्लाऊज या पॅटर्नचा ब्लाऊज हा एक उत्तम पर्याय आहे. डीप नेक आणि फुल स्लीव्ह्सच्या या डिझाईनमुळे तुम्हाला एकदम खास आणि हटके लूक मिळेल. पारंपरिकता आणि मॉडर्न हटके स्टाईल यांचे कॉम्बिनेशन करायचे असेल तर हा लूक नक्कीच ट्राय करा.

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

फ्लोरल प्रिंटेड फॅब्रिकला थोडा मॉडर्न टच दिला, तर त्यातून एकदम स्टायलिश लूक मिळू शकतो. तुम्हाला फक्त साडीला जुळणाऱ्या रंगातील फ्लोरल प्रिंट निवडायची आहे आणि अशा फुल स्लीव्ह डिझाईनमध्ये ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे. हा लूक साधा आणि ट्रेंडीही दिसतो त्यामुळे कोणत्याही खास प्रसंगी उठून दिसतो.

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

बनारसी साडीवर पारंपरिक लूक असलेले ब्लाऊज तुम्ही अनेकदा घातले असतील, पण एकदा तरी हा शिमर लूक असलेला हाय नेक स्टायलिश ब्लाऊज नक्की ट्राय करा. पारंपरिक साडीला मॉडर्न टच देणारा हा ब्लाऊज तुमच्या संपूर्ण लूक अधिकच आकर्षक करेल.

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

आरी वर्क ब्लाऊज साडीच्या लूकला एकदम शाही आणि रॉयल टच देतो. सुबक धाग्यांनी केलेले नक्षीकाम, मोतीवर्क, जरीकाम आणि नाजूक मण्यांचे डिझाईन यामुळे हा ब्लाऊज अगदी उठून दिसतो. खास करून लग्नसराई, सण-उत्सव किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी अशा प्रकारचा आरी वर्क ब्लाऊज साडीला परफेक्ट मॅचिंग होतो. हा ब्लाऊज फार भरजरी असलयाने तुम्हाला जास्त दागिने घालायची गरजही भासत नाही.