Best summer dresses : ऑफिस वेअरसाठी बांधनी ड्रेसचे ५ पॅटर्न, कलरफुल स्मार्ट लूक-कूल स्टाइल
Updated:February 18, 2026 17:18 IST2026-02-17T20:00:00+5:302026-02-18T17:18:08+5:30
summer office wear: trendy office kurtis: cotton bandhani kurti: प्रिंटेड बांधणी कुर्तीचे कलेक्शन ट्राय करु शकतो. पाहूया लेटेस्ट पॅटर्न

उन्हाळा सुरु झाला की आपल्याला अधिक गरम होते. सकाळी ऑफिसला निघताना जरी हवा छान वाटत असली, तरी दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा वाढतो. अशा वेळी ऑफिसमध्ये ९ ते ५ च्या शिफ्टमध्ये बसताना कपड्यांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. (summer office wear)
अनेकदा आपण रोज तेच तेच बोरिंग फॉर्मल शर्ट किंवा साधे कुर्ते घालून कंटाळतो. आपल्याला असं काहीतरी हवं असतं जे दिसायला प्रोफेशनल असेल, पण त्याचा फील मात्र लाईट असेल. उन्हाळ्यात आपल्याला गडद रंग आणि जड फॅब्रिक्स अंगाला टोचायला लागतात. अशावेळी आपण प्रिंटेड बांधणी कुर्तीचे कलेक्शन ट्राय करु शकतो. पाहूया लेटेस्ट पॅटर्न (trendy office kurtis)
ऑफिसमध्ये क्लासी आणि एलिगंट दिसायचे असेल तर रेड बांधनी प्रिंट शॉर्ट कुर्ती ट्राय करु शकतो. हा सिंपल लूक आपल्याला उठून दिसेल.
बांधनीमध्ये पिवळा, गुलाबी, आकाशी निळा आणि केशरी अशा व्हायब्रंट रंगांचा वापर करता येतो. हे रंग उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देतात.
ऑफिस किंवा कॉलेजसाठी गुलाबी रंगाची प्रिंट शॉर्ट कुर्ती ट्राय करता येईल. यावर आपण सिल्व्हर ज्वेलरी देखील ट्राय करु शकतो.
सध्या बाजारात फिरोजी, गाजरी आणि ग्रीन रंगाच्या बांधनी प्रिंट शॉर्ट कुर्ती सध्या ट्रेंडमध्ये आहे. प्रोफेशनल लूकसाठी पांढऱ्या कॉटन पँटवर मल्टीकलर बांधनी कुर्ती ट्राय करु शकतो.
निळ्या किंवा पांढऱ्या जीन्सवर लाल किंवा पिवळ्या रंगाची बांधनी शॉर्ट कुर्ती अतिशय उठून दिसते.