Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तुमच्या कपाटात आहेत का ‘या’ ५ साऊथ इंडियन साड्या, आयुष्यभर नेसा दिसा रॉयल-सगळ्यांची नजर तुमच्यावरच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2026 19:00 IST

1 / 7
साडी हा प्रकार भारतात अधिक लोकप्रिय आहे. साडी ही केवळ नऊ किंवा सहावारी कापड नसून भारतीय संस्कृती, परंपरा आणि सौंदर्याचे प्रतीक मानलं जाते. प्रांत बदललं की साडी नेसण्याची आणि कापड्यातही बराच बदल होतो. त्यातीलच एक साउथ इंडियन साड्या. (South Indian sarees)
2 / 7
साउथ इंडियन साड्या त्यांच्या समृद्ध वारशासाठी, उत्कृष्ट विणकामासाठी आणि मोहक लूकसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. आपल्या घरी लग्न किंवा खास कार्यक्रम असेल तर कपाटात ५ पद्धतीच्या साड्या असायला हव्याच. (traditional Indian sarees)
3 / 7
कांजीवरम साडी ही दक्षिण भारतीय साड्यांची राणी म्हणून ओळखली जाते. ही साडी शुद्ध रेशमापासून बनवलेली असते. त्यावर सोन्या-चांदीच्या जरीचे काम केलेले असते.
4 / 7
कासारवू साडी ही केरळची पारंपरिक साडी तिच्या साधेपणामुळे अत्यंत सुंदर दिसते. ही साडी आपण ओणम, किंवा इतर सणांमध्ये मंदिरातील पूजेसाठी ही साडी छान दिसते.
5 / 7
पोचमपल्ली साडीवर विणकाम केले जाते. ज्यामुळे साडीवर दोन्ही बाजूंनी एकसारखी डिझाइन असते. ऑफिस वेअर किंवा घरातील इतर कार्यक्रमांसाठी ही साडी परफेक्ट आहे.
6 / 7
म्हैसूर सिल्क साडी ही वजनाने हलकी असते. त्यावर प्युअर सोन्याची जर वापरली जाते. घरगुती कार्यक्रम किंवा पार्टी वेअरसाठी बेस्ट आहे.
7 / 7
गडवाल साडी ही कॉटन आणि सिल्क साडीचे सुंदर मिश्रण. ही साडी नेसायला सुंदर व सोपी असते. आपण या साडीला कोणत्याही वेळी सहज नेसू शकतो.
टॅग्स : फॅशनमहिला