1 / 7आपल्यापैकी अनेकांना वाटतं कपडे कोणतेही घातले की ते आपल्याला छान- सुंदर दिसावेत. पण अनेकदा बेली फॅटमुळे आपण आपल्या आवडीचे कपडे घालणे टाळतो. व्यायाम आणि डाएट करुनही एखाद्या खास कार्यक्रमात आपल्याला 'स्लिम आणि ट्रिम' दिसायचं असेल तर काय करावं? अशा वेळी 'शेपवेअर' हा एक जादुई पर्याय ठरतो. (Shapewear for women)2 / 7शेपवेअरमुळे केवळ आपले पोट लपवले जात नाही तर आपल्या शरीराला योग्य आकार मिळतो. आज आपण अशाच काही ४ ट्रेडिंग शेपवेअरबद्दल जाणून घेऊया. जे कोणत्याही आउटफिटमध्ये आपल्याला ग्लॅमरस लूक देतील. (Tummy control shapewear)3 / 7पूर्वी साडीमध्ये पेटीकोट घातला जायचा. पण सध्या साडी शेपवेअर हे मरमेड कटमध्ये असते. जे आपल्या कंबरेला आणि मांड्यांना सुंदर आकार देते. ज्यामुळे साडी नेसल्यावर आपण अधिक सडपातळ आणि उंच दिसतो. शिफॉन किंवा नेटच्या साडीवर हे सुंदर दिसते. 4 / 7आपले पोट सुटलेलं असेल आणि आपल्याला वन- पीस किंवा पेन्सिल स्कर्ट घालायचा असेल हाय-वेस्ट टमी कंट्रोलर शेपवेअर बेस्ट आहे. यामुळे आपली पोटाची आणि कंबरेची चरबी पूर्णपणे झाकली जाते. 5 / 7आपल्याला संपूर्ण शरीर एकसमान हवे असेल तर बॉडीसूट शेपवेअर हा चांगला पर्याय आहे. हे घातल्यामुळे कपड्यांचे फिटिंग इतकं छान दिसतं की बॉडी फॅट दिसत नाही. 6 / 7जीन्स किंवा फिटिंगचे ड्रेसेस घालताना मांड्यांचा आकार मोठा वाटत असेल, तर थाय शेपर्सचा वापर करावा. हे मांड्यांची त्वचा घट्ट पकडून ठेवतात, ज्यामुळे चालताना घर्षण होत नाही आणि लूकही स्लिम दिसतो. 7 / 7शेपवेअर निवडताना कधीही खूप जास्त घट्ट शेपवेअर घेऊ नका. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यासाठी आपल्या साईजनुसार शेपवेअर निवडा.