साधी कुर्ती दिसेल रॉयल, पाहा ५ फुलकारी दुपट्टे-पंजाबी रंगांची मस्त उधळण-दिसाल एकदम स्टायलिश सोनी कुडी

Updated:January 13, 2026 19:00 IST2026-01-13T19:00:00+5:302026-01-13T19:00:02+5:30

Phulkari dupatta designs: Phulkari dupatta trends: kurti styling with dupatta:सध्या ट्रेंडमध्ये असलेले ५ भन्नाट फुलकारी दुपट्टा डिझाइन्सचे पॅटर्न.

साधी कुर्ती दिसेल रॉयल, पाहा ५ फुलकारी दुपट्टे-पंजाबी रंगांची मस्त उधळण-दिसाल एकदम स्टायलिश सोनी कुडी

साध्या पांढऱ्या किंवा प्लेन कुर्तीवर काय घालावं असा प्रश्न अनेकांना पडतो. सणसमारंभात प्रत्येक वेळी आपल्याला नवीन कपडे खरेदी करणं शक्य नसतो. अशावेळी जुन्या कपड्यांना नवीन लूक देण्यासाठी 'फुलकारी दुपट्टा' हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आहे.(Phulkari dupatta designs)

साधी कुर्ती दिसेल रॉयल, पाहा ५ फुलकारी दुपट्टे-पंजाबी रंगांची मस्त उधळण-दिसाल एकदम स्टायलिश सोनी कुडी

हाताने तयार केलेल्या रेशमी धाग्यांच्या या जादूमुळे आपण गर्दीत उठून दिसाल. चला तर मग पाहूया सध्या ट्रेंडमध्ये असलेले ५ भन्नाट फुलकारी दुपट्टा डिझाइन्सचे पॅटर्न. (Phulkari dupatta trends)

साधी कुर्ती दिसेल रॉयल, पाहा ५ फुलकारी दुपट्टे-पंजाबी रंगांची मस्त उधळण-दिसाल एकदम स्टायलिश सोनी कुडी

बाग फुलकारी दुपट्ट्यामध्ये कापडाचा बेस अजिबात दिसत नाही. यामध्ये दाट एम्ब्रॉयडरी केलेली असते. हे दुपट्टे थोडे जड असतात पण सणसमारंभात अधिक सुंदर दिसतात.

साधी कुर्ती दिसेल रॉयल, पाहा ५ फुलकारी दुपट्टे-पंजाबी रंगांची मस्त उधळण-दिसाल एकदम स्टायलिश सोनी कुडी

चोपे फुलकारी दुपट्ट्याच्या कडांवर बॉर्डर जास्त प्रमाणात केली जाते. हा दुपट्टा दोन्ही बाजूने सारखाच दिसतो. आपल्याला खूप हेवी दुपट्टा नको असेल तर चोपे डिझाईन आपल्यासाठी उत्तम आहे.

साधी कुर्ती दिसेल रॉयल, पाहा ५ फुलकारी दुपट्टे-पंजाबी रंगांची मस्त उधळण-दिसाल एकदम स्टायलिश सोनी कुडी

मिरर वर्क फुलकारी ही धाग्यांच्या कामासोबतच यात छोटे आरसे गुंफले जातात. ज्यामुळे याला वेगळी चमक येते. संध्याकाळच्या कार्यक्रमात हा दुपट्टा अतिशय आकर्षित दिसतो.

साधी कुर्ती दिसेल रॉयल, पाहा ५ फुलकारी दुपट्टे-पंजाबी रंगांची मस्त उधळण-दिसाल एकदम स्टायलिश सोनी कुडी

हल्ली तरुणींमध्ये जोमॅट्रिक पॅटर्न्स खूप लोकप्रिय आहेत. त्रिकोण, चौकोन आणि विविध रेषांच्या आकाराची फुलकारी मॉडर्न कुर्ती किंवा अगदी व्हाईट शर्ट आणि जीन्सवरही खूप कूल दिसतात.

साधी कुर्ती दिसेल रॉयल, पाहा ५ फुलकारी दुपट्टे-पंजाबी रंगांची मस्त उधळण-दिसाल एकदम स्टायलिश सोनी कुडी

गडद निळ्या किंवा काळ्या बेसवर पिवळ्या किंवा लाल धाग्यांनी केलेले काम म्हणजे 'नीलक'. हे दुपट्टे कोणत्याही गडद रंगाच्या साध्या सूटवर अतिशय सुंदर दिसतात. या दुपट्ट्यावर ऑक्सिडाइज्ड सिल्वर ज्वेलरी किंवा झुमके खूप सुंदर दिसतात.