1 / 7नवरात्रीमध्ये डांडिया, गरबा आणि रंगीबेरंगी कपडे घातले जातात. पण ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी रोजरोज एथनिक लूल प्लान करणं थोडं कठीणचं. पारंपरिक लूकसोबत आपल्याला स्टायलिश दिसायचं आणि कम्फर्टेबल आउटफिट निवडताना आपली खरी कसरत होते. (Navratri 2025 fashion)2 / 7नवरात्रीसाठी खास ऑफिस वेअर ड्रेस कलेक्शन शोधत असाल तर हे ५ पर्याय बेस्ट आहेत. हे तुम्हाला फेस्टिव्ह लूक देतील. (Navratri office wear ideas)3 / 7फ्लोरल प्रिंट खूपच ट्रेंडी आणि व्हायब्रंट दिसतो. यासाठी आपण कॉटनमध्ये फ्लोरल प्रिंट अफगाणी सूट खरेदी करू शकता. मेहेंदी रंगाचा ड्रेस प्रत्येक त्वचेच्या टोनवर सुंदर दिसतो. 4 / 7फॅन्सी कट वर्क असलेला जॅकेट स्टाईलचा अफगाणी सूट देखील खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला खूप फॉर्मल आणि स्टायलिश लूक मिळेल. 5 / 7एखाद्या खास प्रसंगी अफगाणी सूट घालण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हेवी एम्ब्रॉयडरी असलेला हा पॅटर्न निवडू शकता. यावर सुंदर वर्क करण्यात आले आहे. तसेच कॉन्ट्रास्ट दुपट्टा यावर अधिक सूट होतो.6 / 7रोजच्या वापरासाठी अफगाणी सूट शिवायचा असेल तर आपण सुती कापडाचा वापर करूनही शिवू शकतो. त्याच कापडाचा कुर्ता आणि जुळणाऱ्या सलवारसह साधा दुपट्टा खूप स्टायलिश दिसेल.7 / 7अफगाणी सलवारमध्ये यू शेप कुर्ता खूपच फॅन्सी दिसतो. यात आपण जास्त प्लेट्स असलेली सलावर आणि यू शेप कुर्ता निवडू शकतो.