1 / 7ऑफिसला जाताना नेमकं काय घालावं असा प्रश्न अनेकांना पडतो. आपला लूक हा फक्त कपड्यांवर नाही तर आपण कॅरी केलेल्या अॅक्सेसरीजवरही अवलंबून असतो. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण निवडलेली ऑफिस बॅग. ऑफिस बॅग अशी असावी जी दिसायला स्टायलिश तर असेलच पण त्यात लॅपटॉप, चार्जर, डायरी आणि इतर गरजेच्या वस्तू देखील सहज मावतील. (office bags for women)2 / 7आपल्याकडे या ५ प्रकारच्या बॅग्ज असायला हव्या. ज्या प्रत्येक आउटफिटवर आपल्याला परफेक्ट मॅच होतील. (work bags for women)3 / 7आपल्याला आपला लूक क्लासी आणि आकर्षक बनवायचा असेल तर स्लीक क्रॉस- बॉडी बॅग निवडू शकता. या बॅग्ज आकर्षक दिसतात, ज्या विविध डिझाइन्समध्ये मिळतात. 4 / 7ऑफिसला जाण्यासाठी बॅकपॅकचा विचार करु शकता. या बॅग हातामध्ये छान दिसतात. प्रवास करतानाही सहज कॅरी करता येतात. 5 / 7आपल्या थोडा विंटेज आणि प्रोफेशनल लूक हवा असेल तर सॅचेल बॅग निवडा. या बॅग्जना हँडल आणि लांब पट्टा दोन्ही असतात. इंडो-वेस्टर्न कपड्यांवर या बॅग्ज खूप छान दिसतात. 6 / 7लॅपटॉप आणि काही कागदपत्रे घेऊन जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्लिंग स्टाइल मेसेंजर बॅग उत्तम आहे. ही वजनाला हलकी असते आणि दिसायला खूप मॉर्डन वाटते. 7 / 7क्लासिक लेदर टोट बॅग ऑफिससाठी 'एव्हरग्रीन' मानली जाते. फॉर्मल शर्ट-पँट किंवा एखादी मऊ सिल्कची साडी नेसणार असाल तर ही बॅग आपल्याला चांगला लूक देईल.