1 / 8साडीचा लूक सुंदर दिसण्यासाठी ब्लाऊज हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. अनेक महिलांचे दंड जाड असतात त्यामुळे त्यांना नेमका कोणता ब्लाऊज घालावा समजत नाही. अशावेळी सर्वात सुंदर आणि स्टायलिश पर्याय म्हणजे लांब बाह्यांचे ब्लाऊज. (Long sleeve blouse designs)2 / 8आपले पण दंड खूप जाडजूड असतील तर लांब बाह्यांचे ट्रेंडी पॅटर्न पाहा. (Blouse for heavy arms)3 / 8बटरफ्लाय स्लीव्हज हे अतिशय आकर्षक स्लीव्हज डिझाइन आहे. या स्लीव्हज वरच्या बाजूला घट्ट आणि खालच्या बाजूने अरुंद असतात. 4 / 8ज्या महिलांना आपले दंड कायम जाड वाटतात त्यांच्यासाठी ओव्हर आर्म स्लीव्हज परफेक्ट आहे. 5 / 8पेटल स्लीव्हज ही नवीन ट्रेंडी डिझाइन आहे. जी फुलांच्या पाकळ्यांसारखी दिसते. या स्लीव्हज दोन भागात आहेत जे एकमेकांवर ओव्हरलॅप होतात, ज्यामुळे जाड हात अधिक बारीक आणि आकर्षक दिसतात.6 / 8काऊल स्लीव्हज हे थोडे लूज असते. यामध्ये दंड झाकले जातात पण तरीही ब्लाऊज स्टायलिश दिसतो. 7 / 8कोल्ड शोल्डर स्लीव्हज ही फॅशन सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहे. अल्ट्रा मॉर्डन लूकसाठी हे चांगले आहे. जर आपल्याला साडीला मॉर्डन लूक द्यायाचा असेल. या पद्धतीचे ब्लाऊज नक्की ट्राय करा. 8 / 8जाड दंड असलेल्या महिलांनी ब्लाउज स्लीव्ह डिझाइन निवडताना ते स्टायलिश आणि आरामदायी आहेत याची खात्री करावी.