Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अप्सरा आली..! लग्नसोहळ्यात मानानं मिरवावे ५ अस्सल मराठी दागिने, काठापदराची साडी की नऊवारी-साज मराठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2025 17:19 IST

1 / 7
भारतीय लग्न म्हटलं की नटणं- मुरडणं आलंच. वऱ्हाडापासून नवरीपर्यंत, पोशाखापासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक घटकात एक वेगळाच रॉयल टच दिसतो. साडीची निवड असो, मेकअप असो किंवा केसांची स्टाइल. सगळ्यात महत्त्वाची शोभा वाढवतात ती पारंपरिक दागिन्यांनी.
2 / 7
जर आपल्याही घरी लग्न असेल तर काठाच्या आणि खणाच्या साडीवर कोणते पारंपरिक दागिने घालायला हवे जाणून घ्या.
3 / 7
मोहनमाळ हा एक पारंपरिक मराठमोळा सोन्याचा दागिना आहे. सोन्याच्या तारेमध्ये जोडलेला गोल मण्यांमध्ये असतो. ही माळ एक, दोन, तीन किंवा त्याहून जास्त पदरांमध्ये असते.
4 / 7
महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सगळ्यांचा आवडता दागिना कोल्हापुरी साज. पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे.
5 / 7
चिंचपेटी हा पारंपरिक दागिना आहे. गळ्याभोवती बसणारा घट्ट असा चोकर प्रकार. हा सोन्याच्या चिंचेच्या पानासारख्या पेट्या आणि मोत्यांनी बनवतात.
6 / 7
ठुशी ही गोल मण्यांच्या माळेने बनवली जाते. राजेशाही आणि मनमोहक लुक मिळतो. आता ठुशीच्या बांगड्या, मंगळसूत्र यांसारखे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
7 / 7
नथ हा पारंपरिक दागिना आहे. जो स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतो. महाराष्ट्रात नथ हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लग्न समारंभात किंवा सणासुदीला परिधान केली जाते.
टॅग्स : फॅशनशुभविवाह