Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Gold Nose Pins : रोज वापरण्यासाठी पाहा भन्नाट डिझाइन्सच्या ५ सुंदर नोजपिन्स, नाकात रिंग दिसेल शोभून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2025 17:39 IST

1 / 7
लग्नसराईचा सीझन असल्यामुळे दागिन्यांच्या ट्रेंडमध्ये नथ, नोज रिंग आणि सोन्याच्या नोज पिन्डसची जबरदस्त क्रेझ वाढली आहे. डेली वेअरमध्ये हलकी, साधी आणि तरीही एलिंगट दिसणाऱ्या नोज पिनला मुली आणि महिलांची पहिली पसंती बनली आहे.
2 / 7
ऑफिस, कॉलेज, पार्टी किंवा लग्नसमारंभ कुठेही जाताना नाकातली हा छोटासा दागिना आपला पूर्ण लुक बदलून टाकतो. साधा ड्रेस असो किंवा ट्रेंडी आउटफिट, सोन्याची नोज पिन चेहऱ्याला एक वेगळीच ग्रेस देते. पाहूयात डेली वेअरसाठी सोन्याच्या नोज पिनचे काही डिझाईन्स.
3 / 7
कमळाच्या फुलाची नोज पिन सध्या ट्रेंडमध्ये आहे. इंडो-वेस्टर्न लूक आवडणाऱ्या महिलांसाठी हा खास दागिना आहे.
4 / 7
जर आपल्याला डायमंड नोज पिन घालायची असेल तर हा पर्याय देखील चांगला आहे. ही नोज पिन आपण कोणत्याही वेळी घालू शकतो. यामध्ये मोठ्या आणि लहान अशा विविध डिझाईन्स पाहायला मिळतील.
5 / 7
स्टोन नोज पिनचा ट्रेंड देखील खूप चर्चेत आहे. महिलांमध्ये याची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला विविध रंग देखील मिळतील.
6 / 7
सर्कल नोज पिन देखील विविध डिझाइनमध्ये येतात. हे रोज घालण्यासाठी चांगला पर्याय आहे. हा आपल्याला ट्रेंडी आणि स्टायलिश लूक देईल.
7 / 7
हाफ मून नोज पिनसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत. या सहसा कानातल्यांसारख्या दिसतात. पण यामुळे आपला लूक अधिक सुंदर दिसतो.
टॅग्स : फॅशनमहिला