1 / 7वयाची चाळीशी गाठली की महिलांच्या आयुष्यात एक वेगळीच परिपक्वता येते. ही वेळ स्वत:च्या आरोग्याकडे आणि आवडीकडे अधिक लक्ष देण्याची असते. फॅशनच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ४० नंतर महिलांना केवळ 'स्टाईल' असून चालत नाही, तर 'आराम' (Comfort) अधिक महत्त्वाचा वाटू लागतो.2 / 7चुकीच्या चप्पल घातल्यामुळे टाचदुखी, पाठदुखी किंवा पायांना सूज येते. अशावेळी आपल्याकडे या ५ प्रकारचे फुटवेअर असायला हवे. ज्या अधिक आरामदायी असतील. 3 / 7क्लासिक बॅले फ्लॅट्स हे प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी एव्हरग्रीन आहेत. हे वजनाला हलके असतात आणि कोणत्याही वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांवर उठून दिसतात.4 / 7आपल्याला उंच दिसायचे असेल तर ब्लॉक हिल्सची निवड करा. याची हिल्स रुंद असल्यामुळे पायांना आधार मिळतो. चालताना त्रास होत नाही. साडी किंवा फॉर्मल पँट्सवर हे खूप रॉयल दिसतात.5 / 7पांढरे स्नीकर्स हे जीन्स, कुर्ती किंवा मॅक्सी ड्रेसवरही छान दिसतात. प्रवासात किंवा जास्त वेळ चालण्यासाठी हे सर्वात आरामदायी आणि कूल मानले जातात.6 / 7भारतीय सण आणि समारंभांसाठी छान कोल्हापुरी चप्पल किंवा नक्षीकाम केलेली मोजडी असायलाच हवी. ही कुर्ती-प्लाझो किंवा साडीवर अतिशय सुंदर दिसतात.7 / 7प्रोफेशनल आणि थोडा 'बॉसी' लूक हवा असेल, तर लोफर्स नक्की ट्राय करा. फॉर्मल कपड्यांवर हे छान दिसतात.