1 / 7प्रत्येक रंगाची भाषा काही वेगळीच असते. प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो. काहीतरी सुचवत असतो. म्हणूनच तर प्रेमाचा रंग लाल तर शांतीचा रंग पांढरा असतो. 2 / 7असेच काही रंग आहेत जे सणासुदीच्या काळात नेहमीच हीट ठरतात. त्या रंगांचे कपडे आपण सणासुदीला घातले तर आपोआपच आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसते, नवा उत्साह येतो. असे फेस्टिव्ह वाईब्स देणारे रंग कोणते ते पाहा आणि त्या रंगांच्या साड्या किंवा कुर्ते गौरी- गणपतीदरम्यान घालण्यासाठी तुमच्याकडे तयार ठेवा. 3 / 7पहिला रंग आहे लाल. लाल रंग हा ऊर्जेचे प्रतिक मानला जातो. लग्नकार्य असो किंवा सणवार असो लाल रंगाचे कपडे नेहमीच छान फेस्टिव्ह लूक देतात. 4 / 7दुसरा रंग आहे सोनेरी. सोनेरी रंगाच्या साड्यांची, भरजरी कुर्त्यांची मजाच वेगळी. गोल्डन रंगाची एखादी तरी साडी आपल्याकडे असावीच.5 / 7तिसरा रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतिक मानला जातो. गौरी गणपतीच्या काळात एक दिवस तरी हिरवी साडी नेसाच..6 / 7निळ्याशार रंगाची तर मजाच वेगळी. लग्नसराई, सणावाराला जसा निळा रंगाचा पोशाख शोभून दिसतो, तसाच अगदी फॉर्मल ऑफिस पार्ट्यांसाठीही निळा रंग आवर्जून घेतला जातो. 7 / 7गुलाबी रंगातही किती वेगवेगळ्या रंगछटा आहेत. चमकदार गुलाबी रंगाची किंवा राणी कलरची एखादी तरी साडी सणावाराला नेसण्यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच पाहिजे.