1 / 7कंबरपट्टा याला कमरपट्टा किंवा कमरबंद असं देखील म्हटलं जातं. हा भारतीय अलंकारातील महत्त्वाचा दागिना मानला जातो. विशिष्ट सणसमारंभात किंवा लग्नात याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त बाजारात विविध पद्धतीचे दागिने पाहायला मिळतात. अशातच नवीन नवरीला ओवसा भरताना कंबरपट्टा म्हणून चांदीचा हा लाखमोलाचा दागिना घालू शकते. (Bridal silver ornament)2 / 7हल्ली कंबरपट्ट्यामध्ये मोत्यांचे, कुंदन, फुलांचे, सोनेरी रंगाचे विविध प्रकाराचे डिझाइन्स पाहायला मिळतात. जर आपल्याला देखील चांदीचा कंबरपट्टा घालण्याची इच्छा असेल तर ५ सुंदर पॅटर्न बघाच. (kamarpatta design)3 / 7जर आपल्याला कमरेभोवती चांदीचा कंबरपट्टा नको हवा असेल तर आपण एकाच बाजूला छल्ला लावतो तसा घालता येईल. यामुळे आपला लूक अधिक आकर्षित दिसेल. 4 / 7कमरेवर अँकेलट वेस्ट कंबरपट्टा खूप सुंदर दिसेल. ही डिझाइन्स कोणत्याही वयोगटातील महिलेवर शोभून दिसेल. 5 / 7आपल्याकडे चाव्यांचा गुच्छ असेल आणि त्याप्रमाणे कंबरपट्टा शोधत असाल तर चांदीचा छल्ला चांगला राहिल. यामुळे आपल्याला चांगला लूकही मिळेल. 6 / 7चांदीचा हा साधा कंबरपट्टा ज्याला छोटे घुंगरु लावले आहेत. ते आपल्या नाजूक कंबरेवर शोभून दिसेल. 7 / 7आपल्या खास लूक हवा असेल तर अँटीक डिझाइन असलेला चांदीचा कंबरपट्टा घाला.