1 / 7उन्हाळ्यात आपण फिरायला जाण्याचा प्लान करतो. उन्हाळ्यात फिरताना स्टाईल तर हवीच असते, पण त्याहून महत्त्वाचा असतो तो म्हणजे शरीराला मिळणारा आराम. घाम, वाढतं तापमान आणि तासनतास प्रवास यामुळे जड किंवा सिन्थेटिक कपडे नकोसे वाटतात. अशा वेळी फॅशन जगतात सध्या एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे 'कॉटन कॉर्ड सेट्स'(Cotton co-ord sets)2 / 7कॉटन कॉर्ड सेट्स हा सर्वात सोपा आणि स्वस्त-मस्त पर्याय आहे. जाणून घेऊया ५ अशा ट्रेंडी कॉटन कॉर्ड सेट्सबद्दल. जे आपल्या बॅगेत असायलाच हवेत. (Cotton co-ord sets)3 / 7आपण गोवा किंवा एखाद्या बीच डेस्टिनेशनला जाणार असू तर फ्लोरल प्रिंटेड शर्ट आणि शॉर्ट्स सेट ट्राय करु शकतो. याच्या सुती कापडामुळे घाम शोषला जातो आणि हवेची ये-जा राहते. यावर एक हॅट (Hat) आणि सनग्लासेस घातल्यास बीच लूक पूर्ण होईल.4 / 7ऐतिहासिक ठिकाणे किंवा मंदिरे पाहायला जाताना थोडा फॉर्मल पण आरामदायी लूक हवा असेल तर पेस्टल कलर्सचा कुर्ता आणि पलाझो सेट घालू शकता. यात फिकट गुलाबी, मिंट ग्रीन किंवा स्काय ब्लू सारखे पेस्टल रंग उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देतात.5 / 7खूप लांबचा प्रवास असेल आणि बसून राहावं लागणार असेल तर अशा वेळी सैल कपडे सोयीचे ठरतात. यावेळी ओव्हरसाईज्ड शर्ट आणि ट्राउझर्स घालू शकतो. हे दिसायला अतिशय क्लासी दिसतात आणि शरीराला अजिबात टोचत नाहीत.6 / 7सुट्टीत संध्याकाळी डिनरला जाताना काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर एम्ब्रॉयडरी केलेला कॉटन क्रॉप टॉप आणि स्कर्ट सेट निवडा. 7 / 7मित्रांसोबत फिरण्यासाठी किंवा कॅफेमध्ये जाण्यासाठी टाय-डाय कॉटन कॉर्ड सेट्स प्रिंट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हे दिसायला खूप वायब्रंट आणि कूल असतात.