1 / 8साडी विकत घेताना आपण त्यावरचे मॅचिंग ब्लाऊज देखील खरेदी करतो. पण बदलत्या फॅशननुसार सध्या हा ट्रेंड जुना होताना दिसत आहे. एकाच साडीवर एकाच रंगाचा ब्लाऊज घालणं आता कंटाळवाणं वाटतं. महिलांना एकाच ब्लाऊजवर मॅच होतील अशा साड्या हव्या असतात. जो वेगळा लूक देईल. तसेच वारंवार ब्लाऊज शिवण्याचे फिटिंग करण्याचे टेन्शन राहणार नाही. (Blouse designs for sarees)2 / 8सध्या मिक्स अँड मॅच ब्लाऊज हा ट्रेंड सुरु आहे. योग्य ब्लाऊज असेल तर अगदी साधी साडीही महागडी आणि स्टायलिश दिसू शकते. उलट महागडी साडी असूनही ब्लाऊज चुकीचा निवडला, तर सगळा लूक बिघडतो. पाहूयात सर्व साड्यांवर मॅच होणारे ६ प्रकारच्या ब्लाऊजचे पॅटर्न. (Blouses that match all sarees)3 / 8सगळ्यांचा आवडता आणि पहिला पर्याय म्हणजे काळा ब्लाऊज. काळा रंग कोणत्याही साडीवर उठून दिसतो. साधी कॉटन साडी असो किंवा भारी सिल्क, काळा ब्लाऊज नेहमीच एलिगंट लूक देतो.4 / 8ऑफ-व्हाईट किंवा आयव्हरी ब्लाऊज. हा हलक्या रंगांच्या साड्यांसोबत खूपच ग्रेसफुल दिसतो आणि फेस्टिव्ह किंवा ऑफिस वेअरसाठी परफेक्ट ठरतो.5 / 8गोल्डन किंवा चॅम्पेन शेड ब्लाऊज. हा ब्लाऊज लग्न, समारंभ किंवा पार्टीसाठी सगळ्यात जास्त वापरात येतो. या रंगाचे ब्लाऊज सर्व साड्यांवर शोभून दिसतात. 6 / 8प्रिटेंड किंवा अजरख ब्लाऊज. साध्या साड्यांसोबत हा ब्लाऊज वेगळाच कॅरेक्टर देतो आणि इंडो-वेस्टर्न लूक तयार करतो.7 / 8थोडा हेवी पण प्लेन साड्यांवर अप्रतिम दिसणारा ब्रॉकेड किंवा जॅक्वार्ड ब्लाऊज. हा पॅटर्न कोणत्याही साडीवर सूट होतो. 8 / 8सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा स्लीव्हलेस किंवा हाय नेक सॉलिड ब्लाऊज. हा आपल्याला मॉडर्न टच देतो आणि तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.