1 / 12आपल्यापैकी प्रत्येकीची शरीरयष्टी वेगवेगळी असते आणि त्या शरीरयष्टीनुसार योग्य कपड्यांची निवड केली, तर आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते. जर ब्रेस्ट साईज लहान असेल तर त्यांना ब्लाऊज शिवताना नेमकं कोणत्या (blouse necklines to enhance small bust) डिझाइनच्या नेक पॅटर्न निवडावा, असा प्रश्न नेहमी सतावतो. चुकीच्या नेकलाइनमुळे शरीराचा आकार अधिकच बिघडलेला किंवा विचित्र दिसू शकतो,याउलट योग्य डिझाइन निवडून तुम्ही एक 'इल्यूजन' तयार करू शकता, ज्यामुळे तुमचा लूक अधिक उठावदार आणि बॅलेन्स्ड दिसतो.2 / 12जर ब्रेस्ट साईज लहान असेल अशा शरीरयष्टीवर खूप साधे गळे शिवण्यापेक्षा काही विशिष्ट पॅटर्न्सचे नेक डिझाईन्स तुमच्या ब्लाऊजला एक वेगळाच ग्रेस येतो. ज्या नेकलाईन तुमच्या लूकला एक आकर्षक 'कर्व्ही' फील देतील आणि तुम्हाला अधिक स्टायलिश बनवतील.3 / 12 व्ही-नेक विथ कटोरी पॅटर्न हा एक अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक ब्लाऊज नेकपॅटर्न आहे. जर ब्रेस्ट साईज लहान असेल तर 'व्ही' (V) नेक पॅटर्न विथ कटोरी पॅटर्नचा गळा स्टायलिश दिसतो. हा गळा समोरून 'व्ही' आकारात असून खाली कटोरी जोडलेली असते, ज्यामुळे ब्लाऊजची फिटिंग अतिशय परफेक्ट बसते. कटोरी पॅटर्नमुळे छातीला योग्य आकार मिळतो, तर व्ही-नेकमुळे मानेचा भाग लांब आणि सडपातळ दिसतो. हा पॅटर्न बारीक शरीरयष्टी असलेल्या महिलांपासून थोड्या जड शरीरयष्टी असलेल्या महिलांपर्यंत सर्वांनाच शोभून दिसतो.4 / 12अंगी ब्लाऊज (Aangi Blouse) हा एक अत्यंत पारंपारिक नेकपॅटर्न आहे. विशेषतः जुन्या काळात ग्रामीण भागात आणि आताच्या काळात 'हेरिटेज' फॅशन म्हणून हा पॅटर्न पुन्हा एकदा फॅशनमध्ये आला आहे. हा ब्लाऊज दिसायला साध्या ब्लाऊजपेक्षा थोडा वेगळा आणि अधिक 'कव्हरिंग' देणारा असतो.5 / 12 ज्यांना थोडे डीप गळे आवडतात, त्यांच्यासाठी स्वीटहार्ट नेक (पान गळ्यासारखा प्रकार) चांगला पर्याय आहे. यामुळे तुमच्या वरील भागाला एक सुबक कर्व्ह मिळतो आणि लूक अधिक सुंदर दिसतो. 6 / 12ही सध्या ब्लाऊज आणि ड्रेसमध्ये खूप ट्रेंडिंग असलेली डिझाईन आहे. नावाप्रमाणेच या गळ्याचा आकार झाडाच्या पानासारखा (Leaf Shape) असतो. हा गळा दिसायला अत्यंत नाजूक, सुबक दिसतो. लिफ नेकलाईनमध्ये गळ्याचा आकार खालच्या बाजूला निमुळता होत जातो, जो हुबेहूब पानाच्या टोकासारखा दिसतो. हा आकार 'व्ही-नेक' (V-Neck) आणि 'स्वीटहार्ट नेक' (Sweetheart Neck) यांचे मिश्रण असल्यासारखा वाटतो, पण यात कडा अधिक गोलाकार आणि नैसर्गिक असतात. जर ब्रेस्ट साईज छोटी असेल तर हा नेकपटर्न खूप सुंदर दिसतो, कारण यामुळे छातीच्या भागाला एक सुंदर कर्व्ह मिळतो. या गळ्याच्या उभ्या आकारामुळे मान लांब आणि सडपातळ दिसते, ज्यामुळे तुमचा एकूण लूक अधिक उंच आणि डौलदार वाटतो.7 / 12 स्कॅलप्ड स्वीटहार्ट नेकलाइन ही सध्याची सर्वात हॉट आणि 'मोस्ट डिमांडिंग' ब्लाऊज डिझाइन आहे. जेव्हा पारंपारिक स्वीटहार्ट गळ्याला 'स्कॅलप्ड' (लाटांसारखा वळणदार) काठ दिला जातो, तेव्हा तो अत्यंत डिझायनर आणि महागडा वाटतो. या गळ्याच्या वळणदार कडांमुळे छातीच्या भागाला एक 'व्हॉल्यूम' मिळतो, ज्यामुळे तुमची शरीरयष्टी अधिक कर्व्ही दिसते.8 / 12गळ्याच्या भागावर जर हेवी भरतकाम (Embroidery), मणी किंवा आरशांचे डिझायनर वर्क असेल, तर ते अधिक उठावदार दिसते. जर ब्रेस्ट साईज लहान असेल तर ब्लाऊजचे साधे गळे शिवण्यापेक्षा वर्क असलेले नेकपटर्न शिवल्यास त्या भागाला नैसर्गिकरित्या एक 'व्हॉल्यूम' मिळतो. यामुळे साध्या साडीलाही एक भारी लूक मिळतो.9 / 12 बोट नेक हा ब्रेस्ट साईज लहान असलेल्या महिलांसाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. हा गळा खांद्यापासून रुंद असतो, ज्यामुळे वरचा भाग जास्त 'बॅलेन्स्ड' दिसतो. यामुळे पटकन लक्ष तुमच्या कॉलर बोनकडे जाते आणि ब्रेस्ट साईज लहान न दिसता अधिक कर्व्ही दिसते. 10 / 12 हाय नेक किंवा चायनीज कॉलर असलेले ब्लाऊज खूप स्टायलिश दिसतात. हे ब्लाऊज पूर्ण बंद असल्यामुळे छातीचा भाग झाकला जातो आणि एक प्रकारचा 'इल्यूजन' तयार होतो, ज्यामुळे शरीर अधिक सुडौल वाटते. हे ब्लाऊज कॉटन किंवा सिल्कच्या साड्यांवर अतिशय रॉयल लूक देतात.11 / 12गळ्याच्या भोवती बारीक किंवा मोठी फ्रिल लावल्याने चेस्ट एरियाला एक प्रकारचा 'व्हॉल्यूम' (फुगीरपणा) मिळतो. ज्यांची ब्रेस्ट साईज लहान आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, कारण यामुळे ब्रेस्ट साईजकडील भाग व्यवस्थित दिसतो. 12 / 12 हॉल्टर नेकलाइन हा मॉडर्न आणि बोल्ड लूक देणारा एक उत्तम पर्याय आहे. यात ब्लाऊजच्या पट्ट्या गळ्याभोवती बांधल्या जातात किंवा गळ्यापाशी बंद असतात, ज्यामुळे खांदे आणि पाठ अधिक हायलाईट होतात. ज्यांची ब्रेस्ट साईज लहान आहे, त्यांच्यासाठी हा पॅटर्न अतिशय फायदेशीर ठरतो, कारण यामुळे ब्रेस्ट साईज अधिक सुबक आणि टोन्ड दिसतो. इंडो-वेस्टर्न साड्या किंवा नेटच्या साड्यांवर हॉल्टर नेक ब्लाऊज एक ग्लॅमरस लूक देतात.