Join us
Daily Top 2 Weekly Top 5

केसांत माळण्यासाठी गजऱ्याचे ६ सुंदर नवे प्रकार, तुमच्या साडीनुसार निवडा गजरा, लाखांत एक दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2026 09:40 IST

1 / 6
लग्नसराईचे दिवस असल्याने पारंपरिक वेशभुषा, केशभुषा करून केसांत गजरा माळणे ओघाने आलेच. पण आता गजऱ्याचेही कित्येक वेगवेगळे प्रकार बाजारात मिळत आहेत.
2 / 6
काही खरी फुलं तर काही आर्टिफिशियल फुलं वापरून अशा सुंदर वेण्या तयार करून दिल्या जातात.
3 / 6
गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा सध्या खूप ट्रेण्डिंग असून तुमचा लूक पुर्णपणे बदलून टाकण्यासाठी हा गजरा खरोखरच खूप मदत करतो.
4 / 6
हा साधा मोगऱ्याचा गजरा. पण मधोमध घेण्यात आलेल्या लाल दोऱ्यामुळे तो खूप वेगळा दिसतो आणि केसांत माळल्यावर आकर्षक वाटतो.
5 / 6
मोगरा, कुंदा अशी फुलं आणि त्यात मधोमध गुलाबाच्या पाकळ्या, काही पानं असं डिझाईनही खूपच सुरेख दिसतं.
6 / 6
पांढऱ्या शुभ्र गजऱ्यात मध्येच असं एखादं गुलाबाचं नाजूक फूल घातलं तर तो गजरा निश्चितच जास्त छान दिसते.
टॅग्स : शुभविवाहफॅशनफुलंस्टायलिंग टिप्सकेसांची काळजी