जुन्या बनारसी साड्यांचे शिवा सुंदर Co-ord Sets! स्टायलिश, ट्रेण्डी लूक देणारे ७ सुंदर डिझाईन्स...
Updated:December 16, 2025 09:50 IST2025-12-16T09:48:57+5:302025-12-16T09:50:02+5:30

घरात जुन्या बनारसी साड्या पडून असतील तर त्या बाहेर काढा आणि त्याचे असे मस्त कॉर्ड सेट शिवून घ्या..
सध्या Co-ord Sets चा जबरदस्त ट्रेण्ड आहे. त्यामुळे असा एखादा पीस आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा..
जुनी आकर्षक बनारसी साडी तुमच्याकडे असेल तर अगदी ५०० रुपयांत चांगल्या टेलरकडून तुम्हाला असे ड्रेस शिवून मिळू शकतात.
लग्नसराईमध्ये घालायला जर असा ड्रेस शिवला तर नक्कीच सगळ्यांपेक्षा वेगळ्या आणि आकर्षक दिसाल.
अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्येही तुम्ही कॉर्ड्स शिवू शकता.
हा एक सुंदर प्रकार पाहा. कोणत्याही वयोगटातील महिलेला तो नक्कीच शोभून दिसेल.
थोडा वेस्टर्न लूक हवा असेल तर अशा पद्धतीचा जॅकेट असणारा कॉर्ड सेट शिवा. एकदम स्टायलिश दिसाल