Join us
Daily Top 2 Weekly Top 5

साधा ब्लाऊजही दिसेल डिझायनर! पाहा १० ट्रेंडी डोरी डिझाईन्स - ब्लाऊजला देईल मॉडर्न आणि एलिगंट टच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 20:45 IST

1 / 13
साडी किंवा लेहेंगा कितीही सुंदर असो, पण त्याला खरी शोभा येते ती (back dori style blouse design) आकर्षक ब्लाऊजमुळेच... आणि ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे ब्लाऊजची मागची बाजू... आजकाल ब्लाऊजच्या बॅक डिझाईन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 'डोरी स्टाईल'चा वापर करून त्याला एक खास आणि स्टायलिश लुक दिला जातो. ही डोरी फक्त ब्लाऊजला आधार देत नाही, तर ती ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी एक सुंदर डिझाईन म्हणून देखील शोभून दिसते. जी तुमच्या ब्लाऊजला एक वेगळाच लूक देते.
2 / 13
ब्लाऊज डिझाईनमध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्रेंड येत आहेत. विशेषतः बॅक डोरी पॅटर्न (latest back dori blouse patterns) तर सध्या प्रत्येक महिलांची फर्स्ट चॉईस बनली आहे. साधा सरळ ब्लाऊज पण मागील बाजूला दिलेल्या स्टायलिश डोरी पॅटर्नमुळे एकदम मॉडर्न, एलिगंट आणि ट्रॅडिशनल असा कॉम्बो लूक मिळतो.
3 / 13
लग्नसराई, फेस्टिव्हल किंवा कोणत्याही खास प्रसंगासाठी या बॅक डोरी डिझाईन्स ब्लाऊजला देतात एक वेगळाच ग्लॅमरस टच.
4 / 13
सिंगल टाय डोरी ही सर्वात सोपी आणि पारंपरिक स्टाईल आहे. यात ब्लाऊजच्या वरच्या बाजूस (गळ्याच्या टोकावर) किंवा मध्यभागी फक्त एकच डोरी असते, जी बांधली जाते. साध्या आणि एलिगंट लुकसाठी, किंवा जर ब्लाऊजवर भरतकाम असेल तर डोरीचा हा पॅटर्न अत्यंत शोभून दिसतो.
5 / 13
या डिझाईनमध्ये, एकाच बाजूला किंवा गळ्याच्या दोन्ही बाजूला एकापेक्षा जास्त डोरी लावल्या जातात. त्या वेगवेगळ्या अंतरावर बांधल्या जातात. डीप नेक डिझाईन्सना आधार देण्यासाठी आणि फॅशनेबल लुकसाठी अशा प्रकारच्या मल्टीपल डोरी स्टाईल पॅटर्नचा वापर केला जातो.
6 / 13
क्रिस - क्रॉस डोरी ही 'Corset' स्टाईल म्हणूनही ओळखली जाते. यात गळ्याच्या दोन कडांवर डोरीची अनेक लूप्स लावून, ती दोरी एकमेकांमध्ये क्रिस - क्रॉस पद्धतीने गुंफून बांधली जाते. वेस्टर्न आणि बोल्ड टच देण्यासाठी, विशेषतः लेहेंगा ब्लाऊजवर हे पॅटर्न खूपच सुंदर दिसते.
7 / 13
यात पातळशी डोरी असून त्यावर छोटे मणी किंवा मोती लावलेले असतात आणि डोरीच्या शेवटच्या टोकाला आकर्षक लटकन किंवा गोंडे लावलेले असतात. वेडिंग, रिसेप्शन किंवा पार्टी वेअर ब्लाऊजसाठी अशी डोरी स्टाईल पॅटर्न परफेक्ट लूक देतात.
8 / 13
ही डोरी बांधल्यावर पारंपारिक गाठ न मारता, 'बो' (Bow) म्हणजेच डोरीला फुलपाखरासारखा आकार दिला जातो. यासाठी डोरी थोडी रुंद असावी लागते. लहान मुलींच्या ब्लाऊजसाठी किंवा फॅन्सी आणि क्यूट लुकसाठी ही बो टाय डोरी पॅटर्न अगदी परफेक्ट आहे.
9 / 13
यात डोरी मागच्या गळ्याच्या टोकाला न जोडता, खांद्यावर जोडली जाते आणि लटकन खांद्यावरच्या भागातून पाठीवर येतात. शोल्डर कट-आऊट डिझाईन्समध्ये अधिक आकर्षक दिसतात.
10 / 13
ब्लाऊजच्या पाठीवर एखाद्या विशिष्ट आकाराचा कट - आऊट (उदा. गोल, चौकोनी) दिला जातो आणि या कट - आऊटच्या कडांना डोरी जोडलेली असते. हा पॅटर्न सध्याचा ट्रेंडी आणि मॉडर्न डोरी स्टाईल पॅटर्न आहे.
11 / 13
साधी डोरी न वापरता ब्रेडेड म्हणजे वेणीसारखी विणलेली डोरी ही डिझाईन तुमच्या ब्लाऊजला मॉडर्न लूक देते आणि ब्लाऊजला एकदम क्लासी टच मिळतो.
12 / 13
डोरीला किंवा बॅक पॅनेलला छोट्या मिररवर्कने डेकोरेट केलेला हा पॅटर्न नववधूसाठी आणि स्पेशल ओकेजन्ससाठी परफेक्ट.
13 / 13
ज्या महिलांना हलका आणि सटल लूक आवडतो त्यांच्यासाठी स्लीम स्ट्रॅपसह एक साधी डोरी—अत्यंत ग्रेसफुल.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्स