Join us   

दिवाळीत सुंदर पारंपरिक हेअरस्टाइल करायची तर अंबाडा घालण्याचे बघा ७ ट्रेण्डी आणि सोपे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2023 9:50 AM

1 / 8
हल्ली अनेकजणी लग्नकार्यात किंवा सणावाराल बन हेअरस्टाईल करतात. दिवाळीसारख्या मोठ्या सणाला पारंपरिक वेशभुषा केल्यावर हेअरबन किंवा अंबाडा छानच दिसतो. पण तुमची हेअरस्टाईल इतरांपेक्षा वेगळी असावी, चारचौघीत उठून दिसावी म्हणून बन हेअरस्टाईलचे किंवा अंबाड्याचे हे काही प्रकार पाहा...
2 / 8
थोडा इंडोवेस्टर्न लूक करणार असाल तर ही हेअरस्टाईल छान दिसेल. लहान मुलींसाठी सुद्धा ही हेअरस्टाईल बेस्ट आहे.
3 / 8
समोरच्या बाजूने भांग पाडून दोन्ही बाजूने अशा लहान लहान मेसी वेण्या घालून केलेली मेसी बन हेअरस्टाईलही शोभून दिसते.
4 / 8
फ्रेंच रोल तर नेहमीच लोकप्रिय आहे आणि शिवाय तो दिसतोही छान. बघा घागरा, लेहेंगा घालणार असाल तर अशी हेअरस्टाईलही करू शकता. शिवाय लहान मुलींसाठीही असा हेअरबन छान दिसेल.
5 / 8
समोरच्या बाजुने केस थोडे थोडे स्प्लिट करायचे आणि मागे त्यांचा अंबाडा घालायचा... कधीतरी अशी हेअरस्टाईलही करून पाहा.
6 / 8
साडीवर असा पारंपरिक पद्धतीने मानेच्या थोडासा वर घातलेला अंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा छान दिसतो.
7 / 8
अंबाड्याला पुर्ण गजरा न लावता फक्त खालच्या बाजुनेच गजरा माळायचा... अशी हेअरस्टाईलही छान दिसते.
8 / 8
टॅग्स : दिवाळी 2023फॅशन