1 / 7बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर शिफॉन, जॉर्जेट फॅब्रिकचे कित्येक आकर्षक वन पीस आपण पाहात असतो. 2 / 7हे वन पीस घरातल्या जुन्या साड्यांपासून अगदी कमी खर्चात शिवता येतात.3 / 7जर साडीला मॅचिंग होणारा असा दुसरा एखादा थोडासा कपडा घेतला तर त्याचा असा सुंदर वन पीस शिवता येऊ शकतो. 4 / 7आपल्या घरात अशा बऱ्याच साड्या असतात ज्या नेसून नेसून आपल्याला कंटाळा येतो. त्या नेसाव्या वाटत नसल्या तरी टाकूनही द्याव्या वाटत नाहीत. अशा साड्यांचे मस्त वन पीस किंवा फ्रॉक शिवता येऊ शकतात.5 / 7हजारो रुपये देऊन वन पीस विकत घेण्यापेक्षा अगदी २००, ३०० रुपये शिलाई देऊन तुम्ही असे वन पीस शिवून घेऊ शकता आणि साडीची आठवणही जपू शकता. 6 / 7शिवाय ते उन्हाळा, पावसाळा अशा ऋतूंमध्येही शोभून दिसतात.7 / 7उन्हाळी सहलीला किंवा मान्सून ट्रिपमध्ये असे काही सुंदर ड्रेस आपल्या सोबत हवेतच..