1 / 9लग्नसराईचे दिवस म्हटलं की केसांमध्ये गजरा माळणं आलंच.. साधारणपणे अशा रुटीन पद्धतीने गजरा माळला जातो. पण अशा त्याच त्या पद्धतीने गजरा माळण्यापेक्षा या काही वेगळ्या स्टाईल पाहा.. 2 / 9यामुळे तुमची हेअरस्टाईल साधीच असली तरी गजऱ्यामुळे तिला खूप वेगळा लूक मिळेल आणि चारचौघीत तुम्ही उठून दिसाल..3 / 9अशा पद्धतीचे गजरे हल्ली फुलवाले तयार करून देतात किंवा तुम्ही ते आर्टिफिशियल फुलांचेही घेऊ शकता..4 / 9साधा बो बांधलेला असला तरी त्याला रबरबॅण्ड लावतो त्या ठिकाणी असे भरपूर गजरे लावा.. खूप छान लूक येईल.5 / 9ही एक हेअरस्टाईल पाहा. घागरा, लेहेंगा घालणार असाल तर ही हेअरस्टाईल छान दिसते. तसेच पारंपरिक साडीवरही ती शोभून दिसते.6 / 9हल्ली बन अशा पद्धतीने पुर्णपणे गजऱ्यांनी झाकून टाकण्याचीही फॅशन आहे. अशी हेअरस्टाईलही ट्राय करून पाहा.7 / 9अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या कॉम्बिनेशनमधला गजराही तुम्ही स्पेशली तयार करून घेऊ शकता किंवा दोन गजरे एकत्र जोडून ते ही माळू शकता.8 / 9गजरा माळण्याची ही थोडी ट्रेंडी आणि हटके स्टाईल पाहा.. तरुण मुलींना ही स्टाईल मस्त दिसेल.9 / 9बन घातलेला असेल तर त्यावर गजरा माळण्याची ही आणखी एक खास स्टाईल पाहा..