Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हेवी ब्रेस्टसाठी ७ परफेक्ट ब्लाऊज नेकलाईन! कम्फर्टेबल आणि स्टायलिशही - दिसाल स्लिमट्रिम मिळेल परफेक्ट फिगर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2026 20:05 IST

1 / 10
आपल्या शरीरयष्टीप्रमाणे कपड्यांची निवड केली तर लूक अधिकच आकर्षक आणि संतुलित दिसतो. साडी किंवा लेहेंग्याचा पूर्ण लूक हा ब्लाऊजच्या फिटिंगवर अवलंबून असतो. विशेषतः ज्यांचा ब्रेस्ट साईज हेव्ही आहे किंवा ज्यांच्या छातीचा आकार फारच रुंद आणि मोठा आहे त्यांनी ब्लाऊजची योग्य नेकलाईन निवडणं खूप महत्त्वाचं ठरतं. चुकीची नेकलाईन निवडल्यास लूक बिघडू शकतो किंवा अनकंफर्टेबल दिसू शकतो, तर योग्य पॅटर्नमुळे शरीरयष्टी अधिक सुबक आणि एलिगंट दिसते(blouse patterns for heavy bust women).
2 / 10
अनेकदा ज्या महिलांचे ब्रेस्ट हेव्ही असतात, त्यांना नेमका कोणता गळा (Neckline) शिवावा हे समजत नाही. चुकीच्या नेकलाईनमुळे केवळ तुमचा लूकच खराब होत नाही, तर तुम्हाला अवघडल्यासारखेही वाटू शकते. योग्य नेकलाईन निवडल्यास तुमच्या शरीराचा वरचा भाग बॅलन्स होतो आणि तुम्ही अधिक सुडौल दिसता.
3 / 10
आजकाल साडीसोबत विविध प्रकारचे ब्लाऊज डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहेत, पण प्रत्येक डिझाईन सर्वांनाच सूट होत नाही. त्यामुळे आपल्या बॉडी टाइपनुसार नेकलाईन निवडणं गरजेचं आहे. योग्य नेकपॅटर्न निवडल्यास केवळ कम्फर्टच मिळत नाही, तर तुमचा संपूर्ण लूकही स्टायलिश आणि कॉन्फिडंट दिसतो. हेव्ही ब्रेस्ट असलेल्या महिलांनी नेमके कोणते नेकलाईन पॅटर्न निवडावेत, जे त्यांना स्टायलिश लूकसोबतच पूर्ण आत्मविश्वासही देतील, पाहूयात...
4 / 10
हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी 'व्हर्टिकल स्लिट' (Vertical Slit) नेकलाईन हा एक अतिशय स्टायलिश आणि 'स्लिमिंग इफेक्ट' देणारा पर्याय आहे. जर तुम्हाला खूप डीप गळे घालायला आवडत नसतील, पण तरीही एक मॉडर्न लूक हवा असेल, तर 'व्हर्टिकल स्लिट' हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. यामध्ये गळ्याच्या मध्यभागी एक उभा कट (Slit) असतो. यामध्ये ब्लाऊजचा गळा सामान्यतः गोल किंवा हाय-नेक असतो, पण छातीच्या मध्यभागी एक उभी 'V' किंवा आयताकृती स्लिट दिलेली असते. ही स्लिट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी ठेवू शकता. उभी स्लिट (Vertical line) असल्यामुळे छातीचा भाग पसरट न वाटता थोडा अरुंद आणि बॅलन्स वाटतो.
5 / 10
हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी 'रॅप स्टाईल' (Wrap Style) नेकलाईन हा केवळ एक फॅशन ट्रेंड नसून, शरीर सुडौल दाखवण्यासाठी एक 'मॅजिकल' डिझाईन आहे. रॅप स्टाईल म्हणजे ज्यामध्ये ब्लाऊजचे एक टोक दुसऱ्या टोकावर येऊन बांधले जाते किंवा तसा आभास निर्माण केला जातो. याला 'अंगरखा' स्टाईल असेही म्हणतात. रॅप स्टाईलमुळे मिळणारी तिरकी रेषा छातीचा भाग विभागते, ज्यामुळे हेव्ही ब्रेस्ट असूनही शरीर अधिक स्लिम आणि बॅलन्स दिसते. हे डिझाईन स्तनांच्या आकाराला व्यवस्थित कव्हर करते आणि शरीराला एक सुंदर 'अवरग्लास' शेप देते. कॉटन, सिल्क किंवा अगदी जॉर्जेटच्या साड्यांवरही हा पॅटर्न खूप उठून दिसतो.
6 / 10
हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी हा एक अत्यंत सुंदर आणि स्टायलिश पर्याय आहे, कारण तो स्तनांच्या आकाराला उत्तम कव्हरेज देतो. पण जेव्हा त्याला 'स्कॅलप्स' (Scallops - चंद्रकोरीच्या आकाराचे काठ) जोडले जातात, तेव्हा तो अधिक ग्रेसफुल आणि सुंदर दिसतो. स्कॅलप्समुळे गळ्याकडे लक्ष वेधले जाते, ज्यामुळे लक्ष स्तनांवर केंद्रित न होता पूर्ण चेहऱ्यावर आणि गळ्यावर केंद्रित होते. स्वीटहार्ट आकार हेव्ही ब्रेस्टला योग्य ठिकाणी 'होल्ड' करतो, ज्यामुळे तो भाग सुबक आणि सुडौल वाटतो. लग्नसमारंभ, रिसेप्शन किंवा विशेष सणासुदीला हेव्ही एम्ब्रॉयडरी असलेल्या साड्यांवर हा नेकलाईन पॅटर्न परफेक्ट आहे.
7 / 10
क्रेसेंट शेप्ड नेकलाईनला (Crescent Shaped Neckline) 'अर्धचंद्राकृती गळा' असेही म्हणतात. हा गळा दिसायला थोडा स्क्वेअर (चौकोनी) आणि राऊंड (गोल) गळ्याचे मिश्रण असल्यासारखा वाटतो, पण याचा खालचा भाग चंद्रकोरीप्रमाणे वळणदार असतो. यामध्ये गळ्याची रुंदी खांद्यांकडे थोडी जास्त असते आणि छातीजवळ त्याचा आकार अर्धचंद्रासारखा खोल असतो. हे डिझाईन मानेला आणि खांद्यांना सुंदर फ्रेम करते. हा गळा खांद्यांकडे जास्त पसरलेला असल्याने नजर तिकडे वळते. यामुळे छातीचा भाग प्रमाणाबाहेर भरलेला न वाटता शरीर सुडौल आणि बॅलन्स दिसते. क्रेसेंट आकारामुळे तुमची मान लांब आणि सडपातळ दिसते, ज्यामुळे संपूर्ण 'पोश्चर' अधिक आकर्षक वाटते. हे डिझाईन सिल्कच्या हेव्ही साड्यांपासून ते अगदी साध्या शिफॉन साड्यांपर्यंत सर्वांवर खूप सुंदर दिसते. मॉडर्न आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही लूकसाठी परफेक्ट आहे.
8 / 10
हेवी ब्रेस्ट असलेल्या महिलांसाठी 'नॅरो व्ही नेकलाईन' (Narrow V-Neckline) हा एक 'इन्स्टंट स्लिमिंग इफेक्ट' देणारा सर्वात लोकप्रिय आणि क्लासिक पर्याय आहे. व्ही-नेकचे अनेक प्रकार असतात, पण हेव्ही ब्रेस्ट असेल तर गळा खूप जास्त पसरट (Broad) ठेवण्यापेक्षा तो 'नॅरो' म्हणजेच अरुंद ठेवणे जास्त फायदेशीर ठरते. नॅरो व्ही-नेकमुळे गळा आणि मानेचा भाग लांब दिसतो, परिणामी हेव्ही ब्रेस्ट असूनही शरीर सडपातळ आणि उंच वाटते. हा गळा छातीच्या भागाला दोन भागात विभागल्यासारखा भास निर्माण करतो, ज्यामुळे रुंदी कमी वाटते आणि एक सुटसुटीत लूक मिळतो. हे डिझाईन कांजीवरम सिल्क साड्यांपासून मॉडर्न नेट साड्यांपर्यंत सर्वांवर परफेक्ट मॅच होते. दागिन्यांसाठी ही नेकलाईन उत्तम आहे, कारण यात एक छोटा नाजूक नेकलेस खूप उठून दिसतो.
9 / 10
जर तुम्हाला डीप गळे आवडत नसतील, तर स्क्वेअर नेक एक चांगला पर्याय आहे. हे डिझाईन खांद्यांकडे लक्ष वेधून घेते, ज्यामुळे स्तनांचा भाग तुलनेने कमी उठून दिसतो.
10 / 10
पार्टीवेअर किंवा स्टायलिश साडीवर तुम्ही थोडी खोल 'प्लंजिंग' नेकलाईन ट्राय करू शकता. यामुळे एक स्लीक आणि मॉडर्न लूक मिळतो आणि शरीराची ठेवण सुटसुटीत वाटते.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्समहिलासाडी नेसणे