1 / 9लग्न सोहळा असो किंवा एखादी पार्टी प्रत्येक स्त्रीला गर्दीत उठून दिसावं असं वाटतं. सध्या फॅशनच्या जगात डीप नेक ब्लाऊजचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. पण जेव्हा नेक डीप असतो तेव्हा गळ्याच्या भोवतीचा भाग रिकामा वाटू लागतो. अशावेळी योग्य दागिन्यांची निवड करणं महत्त्वाचे असते. अशावेळी चोकर नेकलेस उत्तम पर्याय ठरतो. (Trending bridal choker designs 2026)2 / 9चोकर हा दागिना गळ्याला लागून असल्याने तो डीप नेक ब्लाऊजवर एक प्रकारचा बॅलन्स निर्माण करतो आणि तुमच्या सौंदर्याला एक वेगळीच उंची देतो. लग्नसराईसाठी सुंदर ७ चोकर डिझाइन्स... (How to style choker with deep neck blouse)3 / 9कुंदनचे दागिने कधीच फॅशनच्या बाहेर जात नाहीत. जर आपण डीप नेक ब्लाऊज घालणार असू तर त्यावर कुंदनचा जड चोकर घालायला हवा. यामुळे आपला गळ्या झाकला जातो आणि रॉयल लूक मिळतो. 4 / 9आपल्याला साधे पण एलिंगट दिसायचे असेल चर मोत्यांचे अनेक पदर असलेला चोकर निवडा. हे कोणत्याही रंगाच्या साडीवर किंवा लेहेंग्यावर उठून दिसतात. 5 / 9टेम्पल ज्वेलरी चोकर हा पैठणी किंवा सिल्क साड्यांवर खूपच शोभून दिसतो. यावर देवांच्या प्रतिमा आणि कोरीव काम राजेशाही थाट निर्माण करते. 6 / 9इंडो-वेस्टर्न लूकसाठी हा बेस्ट पर्याय आहे. स्लिकच्या ड्रेसेसवर किंवा साडीवर ऑक्सिडाइज्ड चोकर आपल्या मॉर्डन आणि पारंपरिक लूक देतो. 7 / 9अनकट डायमंडपासून बनवलेले पोल्की चोकर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. डीप नेक ब्लाऊजसोबत हे चोकर अत्यंत रिच आणि ग्लॅमरस दिसतात. 8 / 9फुलांच्या डिझाईनचे सोन्याचे चोकर नाजूक आणि सुंदर दिसतात. ब्रायडल लूकसाठी हा चोकर निवडला जातो. 9 / 9आपला ब्लाऊज प्लेन असेल तर रंगीबेरंगी खड्यांचा चोकर वापरुन आपण एक सुंदर- उठवादार लूक तयार करु शकतो.