1 / 8जरी काठाची साडी तर मिळतेच मात्र आता तसे ड्रेस पिसही मिळते. दिसायला फार सुंदर दिसणारे जरीचे ड्रेस लहानांपासून मोठे कोणीही वापरु शकते. ७ प्रकार पाहा आणि तसा लुक करा. दिसाल रॉयल आणि सुंदर. 2 / 8लाँग अनारकली ड्रेसच्या खालच्या घेराला जरी काठ लावल्यास ड्रेसला राजेशाही लूक येतो. चालताना घेर खुलतो आणि जरी काठ उठून दिसतो. सण, लग्न समारंभासाठी हा पॅटर्न फार उठावदार वाटतो.3 / 8फ्रॉक पॅटर्नमध्ये खालच्या बाजूला रुंद घेर असल्यामुळे जरी काठ खूप छान बसतो. मुलींच्या ड्रेससाठी हा पॅटर्न विशेष लोकप्रिय असून जरी काठामुळे साधा फ्रॉकही सणासुदीचा दिसतो.4 / 8ए-लाईन ड्रेस सरळ आणि स्लीक असतो. त्याच्या खालच्या काठावर जर वापरल्यास ड्रेसला क्लासिक आणि एलिगंट लूक येतो. जड काठ न घेता मध्यम जाडीचा जरी काठ या पॅटर्नला जास्त शोभतो.5 / 8पॅनल कट ड्रेसमध्ये अनेक तुकडे जोडलेले असल्यामुळे घेर मोठा होतो. अशा ड्रेसच्या खालच्या बाजूला जरी काठ लावल्यास डिझाइन फार रिच दिसतं. नृत्याचे ड्रेस किंवा फंक्शन वेअर साठी हा पॅटर्न उत्तम.6 / 8पुढे लहान आणि मागे मोठा घेर असलेल्या हाय-लो ड्रेसमध्ये जरी काठ फार वेगळ्या पद्धतीने मात्र सुंदर दिसतो. मागच्या लांब घेरावर जर लावायची ड्रेसला फॅशनेबल टच मिळतो.7 / 8सरळ कुर्ती कटमध्ये खालच्या बाजूला जर लावायची. साधा पण सणासुदीला योग्य असा लूक मिळतो. ऑफिस पार्टी किंवा कार्यक्रमांसाठी हा पॅटर्न सोयीचा असतो.8 / 8चेस्टखाली कट असलेल्या एम्पायर वेस्ट ड्रेसमध्ये खालचा भाग फ्लोई असतो. या फ्लोई भागाच्या काठावर जर वापरल्यास ड्रेस ग्रेसफुल दिसतो, विशेषतः सिल्क किंवा कॉटन सिल्क कापड असावे.